वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी देणार आईला 'स्पेशल गिफ्ट'

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी आई हीराबेन मोदी यांच्या 100 व्या वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी आई हीराबेन मोदी यांच्या 100 व्या वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत. पीएम मोदींची आई गुजरातमधील गांधीनगरमध्ये वास्तव्यास आहेत. पीएम मोदींच्या आईच्या वाढदिवसानिमित्त वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी 11 मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये त्यांच्या आईची भेट घेतली होती. त्यानंतर ते दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होते. (pm narendra modi to visit to gandhinagar on june 18 to wish his mothe on her 100 th birthday)

दरम्यान, कोरोना महामारीनंतर (Corona epidemic) पंतप्रधान मोदी आणि त्यांची आई हीराबेन मोदी यांची सुमारे दोन वर्षांनी ही भेट होणार आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, 18 जून रोजी पीएम मोदी वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. वडोदरातील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सुमारे 4 लाख लोकांना संबोधित करणार आहेत. पीएम मोदींचा हा कार्यक्रम जवळच्या सरदार इस्टेटच्या कुष्ठरोग रुग्णालयात होणार आहे.

Prime Minister Narendra Modi
'भारत' जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक: पंतप्रधान नरेंद्र मोदी

महिनाभरातील दुसरा गुजरात दौरा

एका महिन्यात पंतप्रधान मोदींचा हा दुसरा गुजरात दौरा असेल. 10 जून रोजी आपल्या पहिल्या भेटीदरम्यान, PM मोदींनी नवसारीच्या आदिवासी भागात 3,050 कोटी रुपयांच्या 7 प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. याशिवाय पाणीपुरवठा सुधारण्याच्या उद्देशाने इतर 14 हून अधिक प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. 18 जून रोजी होणाऱ्या पीएम मोदींच्या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

जर्मन तंत्रज्ञानाने बनवलेले खास घुमट बसवण्यात येणार आहेत

अधिकृत निवेदनानुसार, कार्यक्रमस्थळी जर्मन तंत्रज्ञानाने बनवलेल्या विशेष घुमटांसह काही विशेष व्यवस्था करण्यात येणार आहेत. रस्त्यांचे कार्पेटिंग, पार्किंग सुविधा, दिवाबत्ती आणि अनुषंगिक सुविधांचे कामही पूर्णत्वास आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी वैद्यकीय पथकेही घटनास्थळी तैनात असतील. या वर्षी गुजरातमध्ये (Gujarat) विधानसभा निवडणुका (Assembly elections) होणार आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी निवडणुकीपूर्वी जनतेपर्यंत पोहोचण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com