5G Launch In India: PM मोदींच्या हस्ते उद्या 5 जी सेवेची सुरुवात

इंटरनेटचे स्पीड होणार सुसाट; दोन वर्षात देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणार 5जी नेटवर्क
5G in India
5G in IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

5G Launch In India: देशात 5 जी सेवा कधी सुरू होणार या प्रश्चाच्या उत्तराची प्रतिक्षा आता संपली आहे. अनेक दिवसांपासून वेध लागलेल्या 5 जी सेवेची सुरुवात अखेर शनिवारी एक ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्लीतून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या सेवेची सुरवात होणार आहे.

5G in India
Light Combat Helicopter: लष्कराला मिळाले पहिले लढाऊ हेलिकॉप्टर, जाणून घ्या खासियत

सुरवातीला देशातील ठराविक शहरांमध्येच ही सेवा सुरु होणार आहे. तथापि, सरकारने कोणत्या शहरात ही सेवा सुरू होणार आहे, त्या शहरांची नावे उघड केलेली नाहीत. पण, आगामी दोन वर्षात संपुर्ण देशभरात हे नेटवर्क लागू केले जाईल.

नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर या काळात सहावी इंडियन मोबाईल काँग्रेस (आयएमएसी) भरणार आहे. यात न्यू डिजिटल युनिव्हर्स अशी या कार्यक्रमाची यंदाची थीम आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून विचारवंत, आंत्रप्रुनर्स, इनोव्हेटर्स आणि सरकारी अधिकारी सहभागी होणार आहेत. यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसाराबाबतनव्या संधींवर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. याच कार्यक्रमात ते देशात 5 जी सेवेची सुरवात करतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

5G in India
Lalu Prasad Yadav On RSS: सर्वात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला!

२०३५ पर्यंत ४५० बिलियन डॉलरची उलाढाल

5 जी सेवेमुळे देशात अनेक नव्या आर्थिक संधी खुल्या होणार आहेत. त्यातून भारतात २०३५ पर्यंत ४५० बिलियन डॉलरची उलाढाल होण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव झाला होता. १.५ लाख कोटींना या स्पेक्ट्रमची विक्री करण्यात आली होती. तीन दिवस चाललेल्या या लिलावात ७२ गिगाहर्टझपैकी ५१.२ गिगाहर्टझ स्पेक्ट्रमची (सुमारे ७१ टक्के) विक्री झाली होती.

स्पेक्ट्रम खरेदीत जिओची आघाडी

भारतीय टेलिकॉम बाजारातील मोठा खेळाडू असलेल्या रिलायन्स जिओने ८८ हजार कोटी रूपये ५ जी स्पेक्ट्रमसाठी मोजले आहेत. दरम्यान, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या मेट्रोसिटीमध्ये दिवाळीपर्यंत ५ जी नेटवर्क सुरू होऊ शकते. तर त्यापुढील १८ महिन्यात म्हणजेच डिसेंबर २०२३ पर्यंत देशाच्या प्रत्येक तालुक्यात ५ जी सेवा सुरू करण्यात येईल, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत सांगितले होते.

रिलायन्स जिओ खालोखाल भारती एअरटेलने ५ जी स्पेक्ट्रमसाठी पैसे मोजलेले आहेत. मार्च २०२४ पर्यंत ग्रामीण भागात ५ जी सेवा मिळेल, असे एअरटेलने सांगितले आहे. याशिवाय स्पेक्ट्रम लिलावात व्होडाफोन आयडिया आणि अदानी डाटा नेटवर्क्स यांनीही बोली लगावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com