PM Modi: PM मोदींबाबत बोलताना बंधू सोमाभाई झाले भावूक, बैठकीत दिला हा मोठा सल्ला, Video

PM Narendra Modi meets brother Somabhai: मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये मतदान केले आणि त्यानंतर त्यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांची भेट घेतली.
PM Modi &  Somabhai
PM Modi & SomabhaiDainik Gomantak

PM Modi Brother Somabhai Modi Emotional: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर आज मतदान होत आहे. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये मतदान केले. त्यानंतर त्यांनी त्यांचे वडिल बंधू सोमाभाई मोदी यांची भेट घेतली. पीएम मोदींच्या भेटीबाबत बोलताना सोमाभाई भावूक झाले, आणि त्यांनी अभिमान वाटल्याचे सांगितले.

पीएम मोदींबद्दल बोलताना त्यांचे बंधू भावूक झाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू सोमाभाई मोदी पंतप्रधानांबद्दल बोलताना भावूक झाले. ते म्हणाले की, 'केंद्राने 2014 नंतर केलेल्या कामांकडे लोक दुर्लक्ष करु शकत नाहीत.' पीएम मोदी आणि त्यांचे बंधू यांच्यात जवळपास 23 मिनिटे चर्चा झाली. यादरम्यान दोघांनाही एकमेकांची विचारपूस केली.

PM Modi &  Somabhai
PM Modi Video: पंतप्रधान मोदींनी रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी थांबवला ताफा

सोमाभाईंनी पंतप्रधान मोदींना हा महत्त्वाचा सल्ला दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या भेटीबद्दल बोलताना सोमाभाई मोदी म्हणाले की, 'त्यांना पंतप्रधान बनताना आणि देशासाठी काम करताना पाहून मला खूप अभिमान वाटतो.' याशिवाय त्यांनी सांगितले की, भेटीत त्यांनी पंतप्रधान मोदींनी एक महत्त्वाचा सल्लाही दिला. ते म्हणाले की, 'मी त्यांना (पीएम मोदी) सांगितले की, ते देशासाठी खूप काम करतात, त्यांनी थोडी विश्रांतीही घ्यावी.'

पंतप्रधान मोदींच्या भावाचा मतदारांना संदेश

गुजरात (Gujrat) निवडणुकीबाबत सोमाभाई मोदी म्हणाले की, 'मतदारांना आपल्या मताचा योग्य वापर करण्याचा आणि देशाची प्रगती करतील अशा लोकांना निवडण्याचा संदेश आहे. 2014 पासून केलेल्या विकासकामांना जनता कौल देत आहे.'

PM Modi &  Somabhai
Gujrat Election : प्रचाराची रणधुमाळी; मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते मोदींच्या गुजरातेत करणार शक्तिप्रदर्शन

पंतप्रधान मोदींच्या आईने मतदान केले

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांनी गांधीनगर येथील रायसन प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर मतदान केले.

14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरु असून राज्यातील 14 जिल्ह्यांतील 93 जागांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतदान सुरु आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 833 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com