Gujrat Election : प्रचाराची रणधुमाळी; मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते मोदींच्या गुजरातेत करणार शक्तिप्रदर्शन

प्रचारासाठी कसली कंबर; ‘आप’च्या नेत्यांनीही स्वीकारले आव्हान
goa leaders Gujrat Election campaign
goa leaders Gujrat Election campaignDainik Gomantak
Published on
Updated on

Gujrat Election : दिल्ली महानगरपालिका आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते आता दिल्लीनंतर गुजरातच्या अखेरच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी रवाना होणार आहेत. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील भाजपच्या महानगरपालिका उमेदवारांसाठी प्रचार केला होता. इफ्फीच्या समारोप सोहळ्याला उपस्थिती लावल्यानंतर मुख्यमंत्री गुजरातला जाणार आहेत.

राजधानी दिल्ली ताब्यात घेण्यासाठी यापूर्वी भाजपने अनेकदा प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आलेले नाही. आता दिल्लीतील महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्याच, यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, प्रदेशाध्यक्ष, वरिष्ठ नेते, सेलिब्रिटी दिल्लीत प्रचारात उतरवले आहेत. देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यांत होत आहे. यासाठी सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते इफ्फीचा समारोप करून गुजरातला रवाना होत आहेत.

दिल्लीत ‘आप’ची सत्ता आहे आणि गुजरातमध्ये त्यांना आपले स्थान मजबूत करायचे आहे. यासाठी ‘आप’ने गुजरातची निवडणूक ही तितकीच गंभीरपणे घेतली असून प्रचारात आघाडी घेतली आहे. ‘आप’चेही अनेक नेते गुजरातला रवाना झाले आहेत.

goa leaders Gujrat Election campaign
Goa Accident : गोव्यात वऱ्हाड्यांच्या बसगाड्यांचा अपघात; बस पलटी झाल्याने अनेकजण जखमी

काँग्रेसमध्ये उदासीनता

काँग्रेसमध्ये राज्यातील पंचायत निवडणुकांप्रमाणेच तिथेही प्रचाराबाबत उदासीनता जाणवत असून ते दिल्ली आणि गुजरातच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी होतील की नाही, हे अद्यापही स्पष्ट नाही.

दरम्यान आमच्यासाठी दिल्ली महानगरपालिका आणि गुजरात विधानसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण स्वतः आणि पक्षाचे वेंझी व्हिएगस आणि क्रूझ सिल्वा हे दोघेही आमदार प्रचारात सहभागी होत आहोत. आपण दिल्लीत अनेक ठिकाणच्या ‘आप’च्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहे, असं गोवा आपचे संयोजक ॲड. अमित पालेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com