PM Narendra Modi Gujarat Visit: पीएम मोदी गुजरात दौऱ्यावर, 6000 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी; शेतकरी बांधवांनी...

PM Narendra Modi Gujarat Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले. महेसाणा येथे पंतप्रधानांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak

PM Narendra Modi Gujarat Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले. महेसाणा येथे पंतप्रधानांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

पंतप्रधानांनी येथे सुमारे 6000 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधान येथे अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

ते आज सकाळी 9.30 वाजता अहमदाबादला पोहोचले आणि बनासकांठाच्या अंबाजी मंदिराकडे रवाना झाले. येथे त्यांनी माता अंबेचे दर्शन घेतले. यादरम्यान, दाभोडा गावात पंतप्रधानांनी जाहीर सभेला संबोधित केले. ते 30-31 ऑक्टोबरपर्यंत गुजरातमध्ये राहतील.

काय म्हणाले पीएम मोदी?

पीएम मोदी म्हणाले की, 'येथे येण्यापूर्वी मला अंबाजी मंदिराला भेट देण्याची संधी मिळाली… ज्या पद्धतीने 'गब्बर' पर्वत (अंबाजी गावाच्या पश्चिमेला एक लहान टेकडी ही देवीची मूळ जागा मानली जाते) विकसित केला जात आहे, मी काल 'मन की बात' मध्ये याबद्दल बोललो.'

सुमारे 6000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची (Project) आज घोषणा करण्यात आली. या प्रकल्पांमुळे शेतकरी सक्षक्त होतील. त्याचबरोबर संपूर्ण देशाबरोबर कनेक्टिविटी वाढेल. मेहसाणाच्या आसपासच्या सर्व जिल्ह्यांना या प्रकल्पांचा फायदा होणार आहे.

PM Narendra Modi
PM Narendra Modi: 3388 दिवसांत पीएम मोदींनी एकदाही नाही घेतली सुट्टी, RTI मधून समोर आली माहिती

गोविंद गुरुजींचा मोदींना उल्लेख केला

गोविंद गुरुजींचे संपूर्ण जीवन भारताच्या (India) स्वातंत्र्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या सेवेसाठी खर्ची पडल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांची सेवा आणि राष्ट्रवाद इतका प्रबळ होता की त्यांनी त्यागाची परंपरा सुरु केली आणि ते त्यागाचे प्रतीक बनले. गेल्या वर्षी आमच्या सरकारने मानगड धामचा राष्ट्रीय स्तरावर विकास केला.

PM Narendra Modi
PM Narendra Modi Speech: 'मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल...' पंतप्रधानांनी मणिपूरवासियांना दिला विश्वास

पंतप्रधान पुढे म्हणाले की, उत्तर गुजरातचे 'बटाटे' जगभर प्रसिद्ध आहेत. येथे मोठ्याप्रमाणात बटाट्याचे उत्पादन येथे होते. इथून बटाट्याची उत्पादने जगभर निर्यात केली जातात.

मोदी पुढे असेही म्हणाले की, डीसा हे बटाट्याच्या सेंद्रिय शेतीचे केंद्र म्हणून विकसित केले जात आहे. बनासकांठा येथे बटाट्यावर प्रक्रिया करणारे कारखाने आहेत. आपल्या शेतकरी बांधवांनी वालुकामय मातीमध्ये बटाट्यासारखे सोने पिकवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com