PM Narendra Modi: 3388 दिवसांत पीएम मोदींनी एकदाही नाही घेतली सुट्टी, RTI मधून समोर आली माहिती

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये देशाची सत्ता हाती घेतल्यापासून गेल्या 9 वर्षात आपल्या कार्यकाळात एकही सुट्टी घेतलेली नाही.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये देशाची सत्ता हाती घेतल्यापासून गेल्या 9 वर्षात आपल्या कार्यकाळात एकही सुट्टी घेतलेली नाही.

माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) मागितलेल्या माहितीच्या उत्तरात सरकारने हे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकही सुट्टी घेतलेली नाही.

पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी केलेल्या प्रश्नाला पीएमओ कार्यालयाने उत्तर दिले आहे.

दरम्यान, पीएमओचे सचिव परवेश कुमार यांनी आरटीआयला उत्तर दिले, जे आरटीआय प्रश्न हाताळणारे संबंधित मंत्रालयाचे मुख्य माहिती अधिकारी (CPIO) देखील आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अलीकडेच पंतप्रधान कसे काम करतात हे सांगितले होते.

बँकॉकमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधताना जयशंकर म्हणाले होते की, मोदींसारखी व्यक्ती पंतप्रधान म्हणून मिळणे ही देशासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. मी त्यांच्या मंत्रिमंडळाचा सदस्य आहे.

Prime Minister Narendra Modi
PM Narendra Modi Speech: 'मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल...' पंतप्रधानांनी मणिपूरवासियांना दिला विश्वास

चंद्रकांत पाटील यांचा दावा, पंतप्रधान दोन तासच झोपतात

गेल्या वर्षी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पंतप्रधान मोदी दिवसातून फक्त दोन तास झोपतात असा दावा केला होता. 2016 मध्ये अशाच प्रकारच्या आरटीआय प्रश्नावर असे उत्तर प्राप्त झाले होते.

त्यावेळी, एका आरटीआय अर्जदाराने देशाचे पंतप्रधान आणि कॅबिनेट सचिवालयाकडून रजेचे नियम आणि प्रक्रियांची प्रत मागितली होती. पंतप्रधान हे नेहमी कार्यरत असतात असे म्हणता येईल, असे पीएमओला माहिती अधिकाराच्या (आरटीआय) उत्तरात सांगण्यात आले होते.

Prime Minister Narendra Modi
Narendra Modi Lok Sabha Speech: “विरोधकांना सिक्रेट वरदान मिळालंय, ते ज्याचं…”, PM मोदींनी सांगितली 3 उदाहरणं

2016 मध्येही माहिती मागवली होती

दुसरीकडे, 2016 मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee), एचडी देवेगौडा, आयके गुजराल, पीव्ही नरसिंह राव, चंद्रशेखर, व्हीपी सिंग आणि राजीव गांधी यांनी सुट्टी घेतली होती का आणि त्याबाबत काही रेकॉर्ड आहे का, हे अर्जदाराला जाणून घ्यायचे होते.

त्याचवेळी, आरटीआयच्या उत्तरात म्हटले आहे की, पूर्वीच्या पंतप्रधानांच्या रजेच्या नोंदींची माहिती या कार्यालयाने ठेवलेल्या रेकॉर्डचा भाग नाही. मात्र, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकही सुट्टी घेतलेली नाही, असे म्हणता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com