Ceasefire:..तर अणुयुद्ध झाले असते, लाखो लोक मेले असते! 'भारत-पाक' तणावावरती ट्रम्प यांचे प्रतिपादन

Donald Trump Ceasefire: ट्रम्प म्हणाले, ‘‘मी म्हणालो, चला अमेरिका तुमच्यासोबत खूप व्यापार करणार आहे. हे युद्ध थांबवू या. तुम्ही जर हे थांबवले, तर आपण व्यापार करू.'
Donald Trump India Pakistan Tension
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

वॉशिंग्टन: ‘‘भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय न घेतल्यास दोन्ही देशांसोबतचा व्यापार थांबविण्याचा इशारा मी दिला. अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही देशांमध्ये आण्विक संघर्षामध्ये रूपांतरित होऊ शकणाऱ्या परिस्थितीला टाळता आले आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (ता. १२) केला. ‘व्हाइट हाउस’ येथे ट्रम्प पत्रकारांशी बोलत होते.

ट्रम्प म्हणाले, ‘‘मी म्हणालो, चला अमेरिका तुमच्यासोबत खूप व्यापार करणार आहे. हे युद्ध थांबवू या. तुम्ही जर हे थांबवले, तर आपण व्यापार करू. पण जर तुम्ही थांबला नाहीत, तर दोन्ही देशांशी कोणताही व्यापार होणार नाही. त्यानंतर दोन्ही देशांनी तातडीने संघर्ष थांबवण्याचा निर्णय घेतला.

Donald Trump India Pakistan Tension
PM Narendra Modi: ..चर्चा होणार फक्त पाकव्याप्त काश्‍मीरवरच! ‘आण्विक ब्लॅकमेल’ अमान्य; वाचा मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

दोन्ही देशांच्या निर्णयांवर परिणाम घडवून आणण्यात व्यापाराचा मुद्दा महत्त्वाचा ठरला.’’ ट्रम्प यांच्या मते त्यांच्या हस्तक्षेपामुळे दोन देशांमधील अणुसंघर्षात रूपांतर होऊ शकणाऱ्या परिस्थितीला टाळता आले आहे. ‘‘आपण अणुसंघर्ष थांबवला. मला वाटते ते एक अत्यंत गंभीर अणुयुद्ध होऊ शकले असते. लाखो लोक मारले गेले असते,’’ असा दावाही ट्रम्प यांनी केला.

Donald Trump India Pakistan Tension
Ceasefire: शस्त्रसंधीसाठी आधी अमेरिकेला गळ, मग भारताला विनंती! पाकच्या अणुकेंद्राचे नुकसान झाल्याची Social Media वर चर्चा

‘‘मला हे सांगताना अत्यंत अभिमान वाटतो की भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाने परिस्थिती ठाम राहून हाताळली. दोघांनीही परिस्थितीची पूर्ण जाणीव ठेवून धैर्य, शहाणपणा दाखवला,’’ असेही ट्रम्प म्हणाले.

पाकिस्तानबरोबरच्या वादात भारताने तिसऱ्या देशाची मध्यस्थी कायम नाकारली असून मागील दोन दिवसांतील पत्रकार परिषदांमध्येही अमेरिकेचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com