संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य करुन राळ उडवून दिली. मोदी सरकारवर हल्लाबोल करताना राहुल म्हणाले की, भाजपने देशाच्या आयडिया ऑफ इंडियावर हल्ला केला. एवढेच नाहीतर त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकले. राहुल गांधी यांनी सभागृहात भगवान शिवाचा फोटो दाखवत त्यांनी नेहमीच अहिंसेची शिकवण दिल्याचे सांगितले.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले की, स्वतःला हिंदू म्हणून घेणारे हिंसाचार भडकवत आहेत. राहुल गांधी यांनी लोकसभेत असे वक्तव्य करताच गदारोळ सुरु झाला. भाजप खासदारांनी राहुल गांधींना निशाण्यावर घेतले. विशेष म्हणजे, राहुल गांधींचे हे वक्तव्य ऐकून पंतप्रधान मोदीही स्वत:ला रोखू शकले नाहीत. पंतप्रधान मोदी अचानक आपल्या आसनावरुन उठले आणि त्यांनी राहुल गांधी यांना चोख प्रत्युत्तर दिले.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब आहे. राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला आहे.' यानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा आपल्या आसनावर बसले. यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान मोदींच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली. राहुल म्हणाले की, भाजप आणि मोदी हा पूर्ण हिंदू समाज नाही. काही वेळाने पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा आपल्या आसनावरुन उठले आणि त्यांनी राहुल गांधी यांना अजून एकदा स्पष्ट उत्तर दिले. विरोधी पक्षनेत्याला गांभीर्याने घ्यायला हवे. संविधानाने मला हेच शिकवले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले...
त्याचवेळी, लोकसभेत राहुल गांधींच्या वक्तव्यावर अमित शाह देखील आपल्या आसनावरुन उठले. शाह म्हणाले की, राहुल गांधींनी आपल्या वक्तव्याने हिंदूंचा अपमान केला आहे. राहुल गांधींनी माफी मागावी. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधींनी सर्व हिंदूंना हिंसक म्हटल्याबद्दल माफी मागितली पाहिजे. कोट्यवधी लोकांना हिंदू असल्याचा अभिमान आहे, ते सर्व हिंसक आहेत, असे राहुल गांधींना वाटते का? असा सवाल गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत विचारला.
राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही भगवान शिवाचा फोटो पाहिला तर तुम्हाला कळेल की हिंदू कधीही भीती आणि द्वेष पसरवू शकत नाहीत, परंतु भाजप दिवसरात्र भीती आणि द्वेष पसरवते. त्याचवेळी, राहुल गांधींनी त्यांचा माईक म्यूट केल्याचा आरोपही केला. त्याचवेळी, लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या हेतूवर शंका घेतल्याबद्दल राहुल गांधींना फटकारले. ते म्हणाले की, त्यांचा माईक कधीही म्यूट केला गेला नाही.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला राहुल गांधी म्हणाले की, भगवान शीवाचा त्रिशूळ अहिंसक आहे. शीवजी सांगतात, घाबरु नका. राहुल गांधींनी भगवान शीवाचा फोटो संसदेत दाखवला. मात्र, त्यावरुन वाद झाल्यानंतर त्यांनी फोटो खाली ठेवला. राहुल पुढे म्हणाले की, तुम्ही मुळीच हिंदू नाही. सत्तेत असलेले हिंदू नाहीत. भारताच्या आयडिया ऑफ इंडियावर, संविधानावर आणि संविधानाला विरोध करणाऱ्यांवर पद्धतशीरपणे सरकारकडून हल्ला केला जातो. आपल्यापैकी अनेकांवर वैयक्तिक हल्ले झाले. काही नेते अजूनही तुरुंगात आहेत. सत्ता आणि संपत्तीचे केंद्रीकरण, गरीब-दलित आणि अल्पसंख्याकांवर हल्ले वाढले. पंतप्रधानांच्या आदेशानुसार माझ्यावर हल्ला करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.