4 राज्यांमध्ये भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचा गुजरातमध्ये रोड शो

यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे.
PM Modi Roadshow
PM Modi RoadshowTwitter/ ANI
Published on
Updated on

अहमदाबाद: यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपला दणदणीत विजय (Assembly Election Result 2022) मिळाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज शुक्रवारपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले. पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये आज रोड शो केला. पंतप्रधान मोदींनी विमानतळ ते अहमदाबादमधील भाजप कार्यालयापर्यंत रोड शो केला. हा रोड शो सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ ते इंदिरा ब्रिज सर्कल ते भाट सर्कल, श्री कमलम मार्गे काढण्यात आला. (PM Modi Roadshow)

पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये रोड शो केला

PM Modi दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले आहे. येथे पंतप्रधान मोदी गुजरात पंचायत महासंमेलनाला संबोधित करणार आहेत. 12 मार्च रोजी पंतप्रधान मोदी राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ (RRU) इमारत देशाला सुपूर्द करतील. एवढेच नाही तर पीएम मोदी आरआरयूच्या पहिल्या दीक्षांत समारंभालाही संबोधित करणार आहेत. गुजरात पंचायत महासंमेलन: 'अपनू गाम, अपनू गौरव' मध्ये राज्यातील पंचायती राज संस्थांच्या तिन्ही स्तरांतील 1 लाखांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी येथे खेळ महाकुंभाचे उद्घाटनही करतील. (Assembly Election Result 2022)

PM Modi Roadshow
अमरनाथ यात्रा होणार सुरू, यात्रेकरूंना प्रथमच रेडिओ टॅग कार्ड मिळणार

पीएम मोदी भाजप नेत्यांनाही संबोधित करतील

PM मोदी भाजप कार्यालयात खासदार, आमदार आणि राज्य संघटनेच्या अधिकाऱ्यांना संबोधित करतील. तेथून पंतप्रधान मोदी गांधीनगरमधील राजभवनात पोहोचतील. संध्याकाळी ते अहमदाबादच्या GMDC मैदानावर गुजरात पंचायत महासंमेलनात सहभागी होतील. पीएम मोदी संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेत सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com