अमरनाथ यात्रा होणार सुरू, यात्रेकरूंना प्रथमच रेडिओ टॅग कार्ड मिळणार

एप्रिलपासून अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंची ऑनलाइन नोंदणी सुरू होणार
Amarnath Yatra 2022 Latest Updates
Amarnath Yatra 2022 Latest UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

Amarnath Yatra 2022 Latest Updates: अमरनाथाची यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी एक चांगली बातमी आहे. येत्या एप्रिलपासून यात्रेकरूंची ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने (SASB) गुरुवारी रात्री ही घोषणा केली. एप्रिलपासून ऑनलाइन प्रक्रियेद्वारे यात्रेसाठी यात्रेकरूंची नोंदणी सुरू करण्याची घोषणा करताना, श्राइन बोर्डाने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील हिमालयीन प्रदेशातील मंदिरात यात्रेकरूंच्या हालचालींचा RFID आधारित ट्रॅकिंग केली जाईल. (Amarnath Yatra Booking will start from april pilgrims will get radio tag card for first time)

काय म्हणाले सीईओ राहुल सिंह

SASB चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल सिंग यांनी जम्मू विभागीय आयुक्त राघव लैंगर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत आगामी यात्रेच्या व्यवस्थेचा आढावा घेताना ते म्हणाले, "अमरनाथ यात्रा ऑनलाइन नोंदणी एप्रिल 2022 मध्ये सुरू केली जाईल. दररोज 20,000 नोंदणीच्या मर्यादेसह ही ऑनलाइन बुकींग सुरू होईल. प्रवासाच्या दिवशी नियुक्त केलेल्या काउंटरवर ऑन-स्पॉट नोंदणी देखील केली जाईल." (Amarnath Yatra 2022 Latest Updates)

Amarnath Yatra 2022 Latest Updates
World Tourism Day: भारतामध्ये काय आहे? म्हणनाऱ्यांनी एकदा फिरून बघाच!

यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठीही आरएफआयडीचा वापर केला जाणार

अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेकडेही त्यांचे लक्ष असणार आहे. सुरक्षेसाठी मंडळ यंदाच्या यात्रेदरम्यान वाहने व भाविकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणार, असल्याचे राहुल सिंह यांनी सांगितले. यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) वापरण्याचा निर्णयही बोर्डाने घेतला आहे.

Amarnath Yatra 2022 Latest Updates
Goa Tourism गोव्यातील ही 5 बेट तुम्हाला माहीत आहेत का ?

मंडळाशी संपर्क कसा करणार

श्री अमरनाथ श्राइन बोर्डाशी संपर्क करण्याचे अनेक मार्ग आहेत. बोर्डाच्या वेबसाइटनुसार, हेल्प लाइन संपर्क क्रमांक +91-194-2313146, मे ते ऑक्टोबरसाठी 2313147 आणि नोव्हेंबर ते एप्रिलसाठी +91-191-2555662, 2503399 हेल्प लाइन संपर्क क्रमांक आहेत. याशिवाय sasbjk2001@gmail.com वरही भावकांना संपर्क साधता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com