PM Modi in Bhopal: 'व्होट बँकेसाठी विरोधक मुस्लिमांना यूसीसीवरुन भडकावत आहेत...', PM मोदींना विरोधकांवर साधला निशाणा

PM Modi: मोदी म्हणाले की, 'व्होट बँकेसाठी विरोधक मुस्लिमांना यूसीसीवर भडकवत आहेत. समान नागरी कायदा काही लोकांना आणू द्यायचा नाही.'
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi in Bhopal: पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच समान नागरी संहितेवर (UCC) स्पष्टपणे बोलले. मोदी म्हणाले की, 'व्होट बँकेसाठी विरोधक मुस्लिमांना यूसीसीवरुन भडकावत आहेत. समान नागरी कायदा काही लोकांना आणू द्यायचा नाही.'

यासोबतच त्यांनी पसमांदा मुस्लिमांबाबत बोलताना ते राजकारणाचे बळी ठरत असल्याचे सांगितले. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत बोलले जात नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, तिहेरी तिलाक बाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, जगातील अनेक मुस्लिम देशांनी तिहेरी तलाक रद्द केला आहे. ते पुढे म्हणाले की, 'तिहेरी तलाकचे समर्थन करणारे व्होट बँकेचे भुकेले आहेत. समान नागरी कायद्याच्या नावाखाली काही लोक मुस्लिम (Muslim) बांधवांना भडकवत आहेत. एकाच कुटुंबात दोन प्रकारचे नियम असतील का?'

PM Modi
Manipur Violence Video: "महिला, 'हे' जाणीवपूर्वक करत आहेत", मणिपूरमधील हिंसाचारावर लष्कर काय म्हणतेय पाहा...

काही लोक UCC बाबत खोट्या अफवा पसरवतात

समान नागरी कायद्याबाबत लोक खोट्या अफवा पसरवत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. कुटुंबात प्रत्येकासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल तर ते कुटुंब चालवता येईल का? समान नागरी कायदा आणा, असे सर्वोच्च न्यायालय वारंवार सांगत आहे, पण या व्होट बँकेच्या भुकेल्या लोकांना तो आणू द्यायचा नाही, असेही पुढे पंतप्रधान म्हणाले.

भाजपची सर्वात मोठी ताकद हे त्यांचे कार्यकर्ते आहेत

‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांसाठी देशाचे हित सर्वोपरि आहे. भाजप (BJP) कार्यकर्त्यांसाठी पक्षापेक्षा देश मोठा आहे. पीएम मोदी पुढे म्हणाले की, 'भाजपची सर्वात मोठी ताकद त्यांचे कार्यकर्ते आहेत.'

या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदींनी एकाच वेळी 10 लाख कार्यकर्त्यांना संबोधित केले. असा कार्यक्रम यापूर्वी कधीच झाला नसावा, असेही ते म्हणाले.

PM Modi
Manipur Violence Update: मणिपूरचे कसे होणार? आधी, मंत्र्यांचे घर आणि गोदाम पेटवले, आता हजारो महिलांनी सुरक्षा दलाला घेरले

आम्ही एसी रुममध्ये बसून पार्ट्या करत नाही

पंतप्रधान पुढे मोदी म्हणाले की, कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बूथ स्तरावरील माहिती खूप महत्त्वाची असते. इतर पक्षांवर निशाणा साधत पीएम मोदी म्हणाले की, आम्ही एसी रुममध्ये बसून पक्ष चालवत नाही, फतवे काढत नाही.

2047 पूर्वी प्रत्येक गाव समस्यामुक्त करणे

'मेरा बूथ, सबसे मजबूत' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2047 पूर्वी प्रत्येक गाव समस्यामुक्त करायचे आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सोलर एनर्जी लावण्यास सांगितले. जेव्हा गावाचा विकास होईल तेव्हाच भारताचा विकास होईल. शाळांमधून गळती थांबवण्याचे काम व्हायला हवे, असेही ते पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com