Indian Armys Video On Manipur Violence: हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील महिला कार्यकर्त्या जाणीवपूर्वक रस्ते अडवत आहेत आणि सुरक्षा दलांच्या कामात हस्तक्षेप करत आहेत. असे लष्कराने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत सांगितले.
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कराने लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
इम्फाळच्या पूर्वेकडील इथम गावात लष्कर आणि महिलांच्या जमावात झालेल्या संघर्षानंतर दोन दिवसांनी लष्कराचे हे विधान आले. या संघर्षामुळे लष्कराला तेथे लपून बसलेल्या KYKL च्या 12 दहशतवाद्यांची सुटका करावी लागली होती.
लष्कराच्या स्पीयर्स कॉर्प्सने सोमवारी रात्री उशिरा ट्विटरवर अशा काही घटनांचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये महिलांचा 'अनावश्यक हस्तक्षेप' सुरक्षा दलांच्या कामांत अडथळा ठरत आहे.
स्पीयर्स कॉर्प्सने म्हटले आहे की, मणिपूरमधील महिला जाणूनबुजून जवणांचा मार्ग रोखत आहेत आणि सुरक्षा दलांच्या ऑपरेशनमध्ये हस्तक्षेप करत आहेत. यामुळे गंभीर परिस्थितीत जवणांना काम करणे अवघड होत चालले आहे.
लष्कराने सांगितले की, 2015 मध्ये 6 डोग्रा युनिट्सवरच्या हल्ल्यासह अनेक हल्ल्यांमध्ये सामील असलेल्या कांगलेई यावोल कन्ना लुप (केवायकेएल) चे 12 सदस्य गावात लपले होते, परंतु जमावाने त्यांना ताब्यात घेण्यापासून रोखले. त्यानंतर, ते सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केलेली शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन गेले. kuki
मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायांमधील जातीय हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मेईतेई समुदायाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी पहाडी जिल्ह्यांमध्ये 3 मे रोजी 'आदिवासी एकता मोर्चा' काढण्यात आल्यानंतर प्रथम संघर्ष झाला.
मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे 53 टक्के मेईतेई आहेत आणि ते बहुतेक इम्फाळ खोऱ्यात राहतात. आदिवासी नाग आणि कुकी लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत आणि ते डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.
केवायकेएल चे सदस्य पळून जाण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर या दंगलखोरांना वाचवण्यासाठी महिलाही मदत करत आहेत. या व्हिडिओमध्ये दहशतवादी महिलांच्या मदतीने पळताना दिसत आहेत.
लष्कराच्या वतीने मणिपूरच्या महिलांबाबत असा दावा करण्यात आला आहे की, ते लष्करी कारवाई सुरू होण्यापूर्वी एकत्र येऊन जवाणांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. यासोबतच जाळपोळ आणि दंगलीची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी त्या लष्कराच्या हालचाली रोखत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.