Diwali at Kargil: कारगिल येथे 'वंदे मातरम'चा नारा; पाहा पंतप्रधानांचे जवानांसोबत खास क्षण

जवानाने गायलेल्या वन्दे मातरम गीतासह मोदींनी धरला ठेका
PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे दिवाळीचा सण भारतीय जवानांसोबत साजरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना मिठाई भरवली व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जवानांनी भारत माता की जय तसेच, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.

यावेळी लष्कराला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आम्ही युद्ध हा पहिला पर्याय म्हणून कधीच पाहिलेला नाही… लंकेतील युद्ध असो किंवा कुरुक्षेत्र, आम्ही ते नेहमीच पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला.

PM Narendra Modi
Diwali Celebration: पंतप्रधान-राष्ट्रपतींनी दिल्या देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा

आम्ही युद्धाच्या विरोधात आहोत पण ताकदीशिवाय शांतता असू शकत नाही. जर कोणी आमच्याकडे वाईट नजरेने पाहण्याचे धाडस केले तर आमचे सैन्य दल चोख प्रत्युत्तर देईल. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

कारगिलमध्ये आपल्या सेनेने दहशतवादाचा फणा ठेचला होता. देशात विजय हा दिवाळी सारखा साजरा करण्यात आला जो आजही लोकांच्या स्मरणात आहे.

PM Narendra Modi
Silver Work: मिठाईवर चांदीचा वर्क का लावला जातो? 'अशी' ओळख भेसळ

यावेळी जवानांनी वंदे मातरम गीत गायले यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सहभाग नोंदवत वंदे मातरम गीताचे बोल गायले. मोदींनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया हँडलवरती शेअर केला असून, तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच, अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदी आणि जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

एखादे राष्ट्र तेव्हांच अमर होते, ज्यावेळेस त्या राष्ट्राची शूर पुत्रांना आणि मुलींना स्वतःच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com