PM मोदींनी 'या' व्यक्तीला भेटण्यासाठी तोडले सुरक्षा कवच, पाहा व्हिडीओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर गुजरात (Gujrat) दौऱ्यावर होते.
PM Modi
PM ModiDainik Gomantak

जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना मानणारे अनेक लोक आहेत. त्यांचे फॉलोअर्स शेजारी देशासह अमेरिकासारख्या (America) बलाढ्य देशातही आहेत. मात्र जेव्हा तुम्ही पंतप्रधानांच्या सुरक्षेचा विचार करता तेव्हा त्यासंबंधी काही प्रोटोकॉल तयार करण्यात आलेले आहेत. मात्र आज असं काही घडलं की, लोक बघतच राहीले. चला तर मग असं काय घडलं त्याबद्दल जाणून घेऊया...

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर गुजरात (Gujrat) दौऱ्यावर होते. त्यांनी भरुचमध्ये देशातील पहिल्या बल्क ड्रग पार्क ची आधारशिला ठेवली. विशेष म्हणजे, ही परियोजना आयात प्रतिस्थापना आणि भारताला (India) औषध क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याचे होती. या परियोजनेची आधारशिला ठेवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. या रोड शो दरम्यान पंतप्रधान मोदी जनतेचा आर्शीवाद घेण्यासाठी त्यांच्यामध्ये मिसळू लागले. जनतेला भेटण्यासाठी त्यांनी चक्क सुरक्षा कवच भेदले.

PM Modi
Ukraine Crisis: युक्रेनवरील हल्ल्यांदरम्यान भारताने जारी केली अ‍ॅडव्हायझरी

यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या एका व्यक्तींने त्यांना एक फोटो (Photo) गिफ्ट केला. तुम्हाला माहितीये का हा फोटो चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचा होता. त्याने पंतप्रधान मोदींना फोटो देताना त्या फोटोवर त्यांचा ऑटोग्राफही घेतला. या व्यक्तीने अगदी नम्रपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या आईचा फोटो गिफ्ट म्हणून दिला. यानंतर त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरलं झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com