PM Modi: कॉंग्रेस माझी कबर खोदण्यात व्यस्त अन् मी... कर्नाटकमधून मोदींचा हल्लाबोल

PM Modi: कॉंग्रेस आणि त्यांचे साथीदार मोदीची कबर खोदण्याची स्वप्ने बघत आहेत तर इथे मोदी गरीबांचे आयुष्य सोपे करण्यासाठी प्रयत्न करण्यात व्यस्त आहे.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

PM Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात असून अनेक योजनांची घोषणा त्यांनी केली आहे. बेंगलोर- म्हैसूर एक्सप्रेसवेच्या उद्धाटनाच्यावेळी पंतप्रधान मोदींनी कॉग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

मोदींनी म्हटले आहे की, कॉंग्रेस आणि त्यांचे साथीदार मोदीची कबर खोदण्याची स्वप्ने बघत आहेत तर इथे मोदी गरीबांचे आयुष्य सोपे करण्यासाठी प्रयत्न करण्यात व्यस्त आहे.

मोदीची कबर खोदण्याची स्वप्ने पाहणाऱ्या कॉंग्रेसला माहित नाही की देशातील लाखो करोडो माता भगिनींचा आशिर्वाद मोदीच्या पाठीशी आहे आणि तो माझा सुरक्षा कवच आहे असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

PM Modi
PM Modi Roadshow Video: पंतप्रधान मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर, जोरदार स्वागत अन् पृष्पवृष्टी, पाहा व्हिडिओ

2014 च्या आधी केंद्रात कॉंग्रेसचे सरकार होते. तेव्हा सामान्य गरीब जनतेला लुटण्याचे काम केले. जे पैसे गरीबांच्या विकासासाठी होते ते कॉंग्रेस( Congress )ने लुटले असेही मोदींनी म्हटले आहे.

दरम्यान, मोदींनी भाजपच्या सरकारने मागच्या 9 वर्षात विविध योजनांद्वारे गरीब लोकांचे कल्याण साधले आहे. सध्या केंद्र सरकार गरीबांसाठी विविध योजना आणत असल्याचे म्हटले आहे. कर्नाटक( Karnataka ) दौऱ्यावेळी मोदींनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Diwali Gift For Indian Railways Employees
Congress Women Leaders Fight
Narendra Modi 25 years in government
Goa Politics
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com