कानपूर विमानतळावर लॅंडींगदरम्यान विमानाचे इंजिन निकामी; जीवितहानी नाही

विमानाचा वेग जास्त असल्याने ते असंतुलित होऊन धावपट्टीवरुन बाजूला झाले.
Plane crash
Plane crash Dainik Gomantak
Published on
Updated on

चेन्नईहून कानपूरला येत असलेल्या तटरक्षक दलाच्या विमानाचे लँडिंगदरम्यान इंजिन निकामी झाले आणि ते एका कट्ट्याला जाऊन धडकले. ही घटना कानपूर विमानतळावर शनिवारी घडली. (Kanpur News)

Plane crash
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर, वाचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लीकवर

मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंगदरम्यान विमानाच्या डाव्या बाजूचे इंजिन निकामी झाल्यामुळे विमान अचानक उजवीकडे वळले. विमानाचा वेग जास्त असल्याने ते असंतुलित होऊन धावपट्टीवरुन बाजूला झाले आणि पुढे एका कट्ट्याला धडकले. या घटनेत जीवितहानी झाली नाही.

विमानतळ (Airport) अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंग केल्यानंतर विमानाच्या डाव्या इंजिनने काम करणे बंद केले. वैमानिकांनी विमान धावपट्टीवर उतरवताच असंतुलणामुळे ते उजवीकडे वळले. वैमानिकांच्या (Pilot) प्रयत्नांनंतर देखील विमान थांबले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com