Video: ''भारत जर्मन उपकरणे खरेदी करणं थांबवेल..''; पीयूष गोयल असं म्हणताच जर्मन व्हाइस चान्सलर तडक उभे राहिले; नेमकं काय घडलं?

Piyush Goyal Confronted German Vice Chancellor: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
Video: ''भारत जर्मन उपकरणे खरेदी करणं थांबवेल..''; पीयूष गोयल असं म्हणताच जर्मन व्हाइस चान्सलर तडक उभे राहिले; नेमकं काय घडलं?
Piyush GoyalDainik Gomantak
Published on
Updated on

Piyush Goyal Confronted German Vice Chancellor: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जर्मनीचे व्हाइस चान्सलर रॉबर्ट हॅबेक यांच्याबरोबर दिल्ली मेट्रोतून प्रवास करताना दिसत आहेत. याचवेळी, गोयल आणि हॅबेक यांच्यातील वार्तालापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. चीनने जर्मन टनेल बोरिंग मशिन्सची विक्री थांबवल्याबाबत गोयल हॅबेक यांना सांगताना दिसत आहेत. अशा समस्या आल्यास भारत जर्मनीकडूनही खरेदी थांबवेल अशी तंबीच गोयल यांनी हॅबेक यांना देवून टाकली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

दरम्यान, रॉबर्ट हॅबेक हे जर्मनीचे वित्तमंत्री देखील आहेत. सध्या ते भारत दौऱ्यावर आहेत. दिल्लीतील द्वारका येथील यशभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जाण्यासाठी त्यांनी पीयूष गोयल यांच्यासोबत दिल्ली मेट्रोची राइड घेतली.

Video: ''भारत जर्मन उपकरणे खरेदी करणं थांबवेल..''; पीयूष गोयल असं म्हणताच जर्मन व्हाइस चान्सलर तडक उभे राहिले; नेमकं काय घडलं?
Piyush Goyal: तीन सरकारी कंपन्यांच्या भवितव्याबाबत लवकरच होणार निर्णय! 'या' तारखेला सरकारची उच्चस्तरीय बैठक

गोयल नेमकं काय बोलले?

दिल्ली मेट्रोतून राइड घेत असताना गोयल यांनी रॉबर्ट हॅबेक यांना सांगितले की, भारत चीनमध्ये मशीन बनवणाऱ्या Herrenknecht नावाच्या जर्मन कंपनीकडून टनेल बोरिंग मशीन्स खरेदी करत आहे. मात्र, चीन TBMs च्या खरेदीवर रोख लावत आहे, यामुळे भारतातील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांवर याचा परिणाम होत आहे.

गोयल आणि हॅबेक यांच्यातील वार्तालापाचा व्हिडिओ एका एक्स यूजरने ‘लॉर्ड बेबो’या यूजर्सच्या नावाने शेअर केला. तुमची जर्मन कंपनी भारताला टनेल बोरिंग मशीनचा पुरवठा करते, जी चीनमध्ये आहे. परंतु चीनने या विक्रीवर रोख लावली आहे, असे गोयल स्पष्टपणे हॅबेक यांना सांगताना व्हिडिओमध्ये दिसतायेत.

Video: ''भारत जर्मन उपकरणे खरेदी करणं थांबवेल..''; पीयूष गोयल असं म्हणताच जर्मन व्हाइस चान्सलर तडक उभे राहिले; नेमकं काय घडलं?
Ration Card: मोफत राशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, खाद्यमंत्र्यांनी जारी केला नवा आदेश

गोयल यांनी कंपनीचे नाव Herrenknecht असल्याचे सांगितल्यावर हॅबेक पहिल्यांदा टाळाटाळ करताना दिसले. त्यांनी विचारले की, "ही कंपनी चीनमध्ये उत्पादन करते का?" ज्याला गोयल यांनी होय असे उत्तर दिले. त्यानंतर गोयल म्हणाले की, ''आता जर्मन उपकरणे खरेदी करणे थांबवले पाहिजे.” गोयल यांनी असे म्हणताच हॅबेक तडक उभे राहिले, जे वार्तालापादरम्यान बसले होते. दिल्ली, बंगळुरु चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प यासह देशातील अनेक प्रकल्पांमध्ये हेरेनक्नेचच्या टनेल बोरिंग मशिन्सचा वापर केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com