Pink Whats App And Cyber Fraud:
सोशल मीडियावर रोज नवनवीन घोटाळे होत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत आहेत आणि सोशल मीडियावर विश्वासही ठेवत आहेत.
इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हाट्सअॅपच्या माध्यमातून दररोज लोकांची फसवणूक होत आहे. आता पिंक व्हाट्सअॅप घोटाळा सुरू आहे, त्याबद्दल मुंबई पोलिसांनी नागरिकांना सतर्क केले आहे. पिंक व्हाट्सअॅप इतके धोकादायक आहे की, ते तुमची संपूर्ण आयुष्यभराची कमाई नष्ट करू शकते.
पिंक व्हाट्सअॅप म्हणजे काय?
पिंक व्हाट्सअॅप हे थर्ड पार्टी डेव्हलपर्सनी तयार केलेल्या मूळ WhatsApp ची क्लोन कॉपी आहे. पिंक व्हाट्सअॅपचा, व्हाट्सअॅप किंवा मेटाशी काहीही संबंध नाही. तुम्हाला पिंक व्हाट्सअॅप गुगल प्ले-स्टोअर किंवा अॅपलच्या अॅप स्टोअरवरही मिळणार नाही.
त्याची एपीके फाइल व्हायरल होत आहे,ज्याच्या मदतीने लोक अॅप इन्स्टॉल करत आहेत. पिंक व्हॉट्सअॅपमध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत जी मूळ व्हॉट्सअॅपमध्ये उपलब्ध नाहीत.
पिंक व्हाट्सअॅप सुरक्षित आहे का?
पिंक व्हॉट्सअॅपमध्ये कॉलसाठी सेटिंगही करता येते, ज्याद्वारे तुम्ही निवडू शकता की तुम्हाला कोण कॉल करू शकेल आणि कोण नाही.
पिंक व्हॉट्सअॅपमध्ये फीचर्स खरोखरच चांगले आहेत. पण, गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ते चांगले नाही. हे अॅप तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकते आणि बँक खातेही रिकामे करू शकते.
पिंक व्हॉट्सअॅपमुळे तुमच्या फोनचे कंट्रोल दुसऱ्याकडे जाते का?
पिंक व्हॉट्सअॅप बाबत मुंबई आणि तेलंगणा सायबर पोलिसांनी अलर्ट जारी केला असून, पिंक व्हॉट्सअॅपच्या लिंकवर क्लिक करू नका, असे म्हटले आहे.
या अॅपच्या मदतीने तुमचा फोनही हॅक होऊ शकतो. पिंक व्हॉट्सअॅपच्या मदतीने तुमचा फोन रिमोट कंट्रोल केला जाऊ शकतो.
पिंक व्हॉट्सअॅप चुकून डाऊनलोड झाल्यास काय करावे?
जर तुम्ही यापूर्वी तुमच्या फोनवर पिंक व्हॉट्सअॅप इन्स्टॉल केले असेल तर, प्रथम तुम्ही ते अनइन्स्टॉल करा. हे तुम्ही सहज करू शकता. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन अॅप्समध्ये जाऊन व्हॉट्सअॅप (पिंक पीपल) वर क्लिक करून ते अनइंस्टॉल करा. याशिवाय तुमच्या फोनच्या डेटाचा बॅकअप घेऊन तो फॉरमॅट केल्यास अधिक चांगले होईल.
थर्ड पार्टी अॅप्स सुरक्षित असतात का?
थर्ड पार्टी अॅप्स कधीही सुरक्षित नसतात. त्यामुळे अॅड्राइड यूजर्सनी कायम गूगल प्ले स्टोअरवरून अॅप्स डाउनलोड करावीत. तर आयओएस वापरणाऱ्यांनी अॅप्स डाउनलोड करण्यासाठी अॅप स्टोअर वापरावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.