भारतीय स्त्रियांच्या निर्णयांवर पारंपारिक नियमांचे वर्चस्व; इंटरनॅशनल रिसर्चचा खुलासा

मुलांची काळजी घेणे ही मुख्यतः महिलांची जबाबदारी आहे.
How Indians View Gender Roles in Families and Society
How Indians View Gender Roles in Families and SocietyDainik Gomantak
Published on
Updated on

तसे तर बहुतेक भारतीय हे सार्वजनिकरित्या मान्य करतात की स्त्री आणि पुरुष दोघेही समान आहेत. तरीही जेव्हा कुटुंबातील स्त्रियांच्या भूमिकेचा विचार केला जातो तेव्हा पारंपारिक नियमांचे वर्चस्व दिसून येते. अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरच्या (Pew Research Center) अभ्यासातून एक खास बाब पुढे आली आहे. या रिसर्चमध्ये असे निदर्शनास आले आहे की, '34 टक्के लोकांचा असा समज आहे की, मुलांची काळजी घेणे ही मुख्यतः महिलांची जबाबदारी आहे.' हा अहवाल 29,999 प्रौढांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे.

पारंपारिक भूमिकांना प्राधान्य

वॉशिंग्टन येथील प्यू रिसर्च सेंटरमधून 2 मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या 'हाऊ इंडियन्स व्ह्यू जेंडर रोल्स इन फॅमिलीज अँड सोसायटी' (How Indians View Gender Roles in Families and Society) या विषयाचा अभ्यास, नोव्हेंबर 2019 ते मार्च 2020 दरम्यान 29,999 भारतीय प्रौढांच्या सर्वेक्षणावर आधारित करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, एकीकडे भारतीय महिलांना राजकीय नेता म्हणून स्वीकारतात, तर त्यांच्यापैकी बहुतांश महिलांच्या कौटुंबिक जीवनात पारंपारिक भूमिकांना प्राधान्य दिले जातात.

How Indians View Gender Roles in Families and Society
वडोदरावासीयांना क्रॉक्स मासे करतात सतर्क

पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही पैसा कमवावा

अहवालानुसार, 55% भारतीयांचा असा विश्वास होता की पुरुष आणि स्त्रिया दोघेही समान नेतृत्व करणारे राजकीय नेते आहेत. पत्नीने नेहमी आपल्या पतीच्या आदेशाचे पालन केले पाहिजे, असे दहापैकी नऊ भारतीयांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे, बहुसंख्य (54%) नागरिक म्हणतात की पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही पैसा कमवावा, तर 43% लोकांच्या मते कमाई ही प्रामुख्याने पुरुषांची जबाबदारी आहे. या पुढे सर्वात धक्कादायक बाबा म्हणजे, 80 टक्के भारतीयांनी या मताशी सहमती दर्शवली की जेव्हा नोकऱ्यांच्या ठिकाणी जागा कमी असतात तेव्हा स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त प्राधान्य दिले पाहिजे.

How Indians View Gender Roles in Families and Society
आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी, तातडीने उपचार सुरु

मुलांना प्राधान्य दिले पाहिजे

सर्वेक्षणात बहुतांश भारतीयांनी मुलगा आणि मुलगी या दोघांना महत्त्व दिले. तरीही सुमारे 94% लोकांनी सांगितले की कुटुंबासाठी किंवा कुटूंब पुढे नेण्यासाठी किमान एक मुलगा असणे खूप महत्वाचे आहे. तर मुलींसाठी असे म्हणणाऱ्यांचा आकडा 90% आहे. सुमारे 64 टक्के भारतीयांनी असेही म्हटले आहे की मुलगा आणि मुलीला पालकांकडून वारसा मिळण्याचा समान अधिकार असावा. दहापैकी चार प्रौढांनी म्हातार्‍या आई-वडिलांची काळजी घेण्याची प्राथमिक जबाबदारी मुलांची असायला हवी असे सांगितले, तर केवळ 2% लोकांनी ही जबाबदारी मुलींची असल्याचे सांगितले. अशा विविध विषयांना वाचा फोडणारा हा अहवाल प्यू रिसर्च सेंटरमधून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com