ईडी प्रमुख संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना एक वर्षाचा कार्यकाळ वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात कॉमन कॉजने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
sanjay kumar mishra
sanjay kumar mishraDainik Gomantak
Published on
Updated on

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीचे (ED) संचालक संजय कुमार मिश्रा यांना एक वर्षाचा कार्यकाळ वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात कॉमन कॉजने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. (Petition in the Supreme Court against the decision of ED chief Sanjay Kumar Mishra to extend his tenure)

sanjay kumar mishra
Shrawan 2022: काशी विश्वनाथाचं दर्शन महागलं, पूजेसाठी मोजावे लागणार ऐवढे पैसे

तर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आहे, ज्याने संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ आणखी न वाढवण्याचा देखील निर्णय घेतला होता. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर वकील प्रशांत भूषण यांनी या प्रकरणाचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे.

केंद्रीय दक्षता आयोग (CVC) कायद्यात सुधारणा करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने (Central Government) गेल्या वर्षी एक अध्यादेश आणला होता, ज्यामुळे सीबीआय आणि ईडीच्या प्रमुखांना पाच वर्षांपर्यंतचा कार्यकाळ देण्याचा अधिकार मिळावा असे त्यामध्ये म्हटले होते. तर आता ईडी संचालकाचा कार्यकाळ 5 नोव्हेंबर 2022 रोजी संपत आहे.

sanjay kumar mishra
भिंद्रनवाला पिक्चर प्रकरणी पंजाब सरकारचा यू-टर्न, जाणून घ्या काय आहे नवा आदेश

सरकारने संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला होता तर या प्रकरणी अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी म्हटले की, या प्रकरणी नवीन याचिका दाखल करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com