भिंद्रनवाला पिक्चर प्रकरणी पंजाब सरकारचा यू-टर्न, जाणून घ्या काय आहे नवा आदेश

पंजाबमधील जर्नेलसिंग भिंद्रनवाला आणि त्याच्या समर्थकांचे फोटो हटवल्याप्रकरणी पंजाब सरकारने यू-टर्न घेतला आहे.
Bhagwant Mann
Bhagwant MannDainik Gomantak
Published on
Updated on

Jarnail Singh Bhindrawale: पंजाबमधील जर्नेलसिंग भिंद्रनवाला आणि त्याच्या समर्थकांचे फोटो हटवल्याप्रकरणी पंजाब सरकारने यू-टर्न घेतला आहे. 'आप' सरकार यापूर्वीही अनेक वेळा आदेश देऊन किंवा अशा मोठ्या निर्णयांना पाठिंबा देऊन मागे हटले आहे. अलीकडेच पेप्सू रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (PRTC) पतियाळाने पंजाबच्या सरकारी बसमधून भिंद्रनवालाचा फोटो काढून टाकण्याचा आदेश मागे घेतला आहे.

दरम्यान, पेप्सू रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन पतियाळानुसार, अनेक धार्मिक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. या निर्णयामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी जारी केलेला आदेश मागे घेण्यात आला आहे. नुकतेच डीजीपी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशात काही अराजक घटकांनी सरकारी बसेसमध्ये भिंद्रनवालाचा फोटो लावला असल्याचे म्हटलेआहे. आदेशात हा फोटो काढून टाकण्यास सांगितले होते.

Bhagwant Mann
Agnipath Scheme: अग्निपथ योजनेविरोधात पंजाब विधानसभेने ठराव केला मंजूर

त्याचवेळी हा आदेश आल्यानंतर शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने विरोध दर्शवला आहे. यासोबतच समितीचे सदस्य गुरचरण ग्रेवाल यांनी ट्विट करुन आदेशाचा निषेध केला होता. त्याचबरोबर याआधीही अनेक प्रकरणांमध्ये सरकारने (Government) यू-टर्न घेतला आहे. 18 एप्रिल रोजी एडीजीपी ट्रॅफिक एएस राय यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानंतर पंजाबमध्ये (Punjab) चालणाऱ्या जुगाड वाहनांवर बंदी घातली होती, मात्र काही दिवसांनी सरकारने हा आदेश मागे घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

8th Pay Commission Latest Update
Girl Dancing In Moving Local Train
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com