Gujarat High Court: '...देशाशी एकनिष्ठ असले पाहिजे,' गुजरात उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्याला फटकारले

Gujarat: देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्या दिवंगत आई हीराबेन यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरु नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
Court
Court Dainik Gomantak

Gujarat High Court: सोशल मीडियावर भारतविरोधी मजकूर शेअर केल्याचा आरोप असलेले काँग्रेस नेते अफजल लखानी यांचा जामीन अर्ज गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळला. देशात राहणाऱ्या व्यक्तीनेही देशाशी एकनिष्ठ असायला हवे, असे न्यायालयाने नमूद केले.

यासोबतच देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्या दिवंगत आई हीराबेन यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरु नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, जामीन याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एनएस देसाई म्हणाले की, 'जे भारतात राहत आहेत, त्यांनीही भारताशी (India) एकनिष्ठ असले पाहिजे. सामग्रीची तपासणी केल्यावर असे आढळून आले की, अर्जदाराने विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावणाऱ्या काही टिप्पण्या केल्या आहेत.

त्याचबरोबर काही अपमानास्पद पोस्टही केल्या आहेत. असे आणखी काही साहित्य आहेत, ज्याचा समाजावर मोठा परिणाम होऊ शकतो.'

Court
Karnataka High Court: मुलीची ताबा वडिलांकडे दिला नाही; कोर्टाने दिला महिलेचे वेतन रोखण्याचा आदेश...

न्यायालयाने म्हटले की, 'एखादी व्यक्ती एखाद्याला आवडू शकते किंवा नापसंत करु शकते, परंतु याचा अर्थ असा नाही की त्याने देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल अपमानास्पद भाषा वापरणे सुरु केले पाहिजे.'

न्यायालयाने पुढे म्हटले की, 'त्या पोस्टमधील भाषा इतकी अपमानास्पद आहे की त्याचा या आदेशात समावेश करणे शक्य नाही.'

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, 'ही पोस्ट अजेंडा आधारित आहेत.... अशा व्यक्तीला जामीन मिळाल्यास तो पुन्हा वेगवेगळ्या नावाने किंवा बनावट आयडीने असा गुन्हा करण्याची शक्यता आहे.'

Court
Patna High Court: 'कर्ज परतफेडीसाठी जबरदस्तीने वाहन जप्ती चुकीची,' हायकोर्टाचा निर्वाळा

आरोप काय आहेत

लखानी यांच्यावर अशी 18 पेज तयार केल्याचा आरोप आहे, जिथे ते अशा भारतविरोधी पोस्ट टाकत असे, ज्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होऊ शकते.

अशा पोस्टमध्ये केवळ पंतप्रधानांवरच निशाणा साधला जात नाही, तर एका विशिष्ट समुदायाविरोधातही टिप्पणी करण्यात आली आहे. ते पाकिस्तान (Pakistan) आणि इतर देशांना आंतरराष्ट्रीय कॉलही करत असे, असे आरोप आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com