Air India Pee-Gate: एअर इंडियाला 30 लाखांचा दंड, पायलटचा परवाना निलंबित

यासोबतच एअर इंडियाच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सर्व्हिसेसला कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
Air India Pee-Gate
Air India Pee-GateDainik Gomantak
Published on
Updated on

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याप्रकरणात मोठी कारवाई केली आहे. DGCA ने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, यावेळी विमान उडवणाऱ्या पायलटचा परवाना देखील 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. ( Air India Pee-Gate )

यासोबतच एअर इंडियाच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सर्व्हिसेसला कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

Air India Pee-Gate
Joshi Math Sinking : कशी आहे जोशीमठची सध्याची स्थिती? तीन दिवसांत भेगा वाढल्या नाहीत, वाचा सविस्तर

गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या लघुशंका घटनेमुळे एअर इंडियाने गुरुवारी प्रवासी शंकर मिश्रा यावर चार महिन्यांची बंदी घातली होती. ही घटना 4 जानेवारी रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) निदर्शनास आली आणि सध्याची कारवाई विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल करण्यात आली आहे.

दरम्यान, एअर इंडियाच्या सीईओने या घटनेबद्दल माफी मागितली होती. सीईओ म्हणाले होते की चार क्रू मेंबर्स आणि एका पायलटला तपास पूर्ण होईपर्यंत ड्युटीवरून काढून टाकण्यात आले आहे आणि विमान कंपनीने बोर्डवर अल्कोहोल सर्व्ह करण्याबाबत पुर्नविचार करण्याचे ठरवले आहे.

Air India Pee-Gate
Republic Day Parade Ticket: घरबसल्या करता येणार प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे तिकीट बुक, जाणून घ्या

टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनीही या प्रकरणाची दखल घेतली होती. एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने एका महिला प्रवाशावर लघुशंका केल्याची घटना त्यांच्यासाठी वैयक्तिक दुःखाची बाब आहे.

चंद्रशेखरन यांनी एका निवेदनात म्हटले होते, "एअर इंडियाचा प्रतिसाद अधिक जलद असायला हवा होता. ही परिस्थिती जशी हाताळायला हवी होती तशी हाताळण्यात आम्ही अपयशी ठरलो." असे त्यांनी म्हटले होते.

नोव्हेंबरमध्ये घडलेल्या या घटनेला एक महिन्याहून अधिक काळ लोटल्यानंतर गेल्या आठवड्यात शंकर मिश्रा यांना अटक करण्यात आली होती. अमेरिकन बँकिंग क्षेत्रातील दिग्गज वेल्स फार्गोनेही त्यांना नोकरीवरून काढून टाकले.

आरोपी शंकर मिश्रा हा 26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये न्यूयॉर्क ते न्यू दिल्ली प्रवासादरम्यान मद्यधुंद अवस्थेत होता, जेव्हा त्याने बिझनेस क्लासमध्ये बसलेल्या 72 वर्षीय महिलेवर लघुशंका केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com