‘आप करे तो रासलीला, हम करे तो कैरेक्टर ढीला’, भाजपाचा संसदेत विरोधकांवर हल्लाबोल

राहुल गांधी आज बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र ते उशिरा उठले असतील असा चिमटा दुबेंनी काँग्रेस पक्षाला काढला.
Rahul Gandhi Vs Amit Shah No confidence motion against modi government
Rahul Gandhi Vs Amit Shah No confidence motion against modi governmentDainik Gomantak

No Confidence Motion against Modi Government in Parliament

मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांनी दिलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी लोकसभेत चर्चा झाली. “पंतप्रधान मोदी मौनव्रत धारण करतात, मी सावरकर नाही, माफी मागणार नाही” अशी विधानं करणाऱ्या राहुल गांधींचा भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी समाचार घेतला. “मोदींची ते का माफी मागतील, खालच्या जातीच्या लोकांची तुम्ही का माफी मागणार.  तुम्ही सावरकरही होऊ शकत नाही, सावरकरांनी तब्बल २८ वर्षे तुरुंगात काढलीत”, असं सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी संसदेत सुनावले आहे.

आसामचे काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला. चर्चेच्या सुरूवातीला गौरव गोगोई यांनी भूमिका मांडली. त्यावर सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिले. (BJP MP Nishikant Dubey Vs Congress MP Gaurav Gogoi)

काय म्हणाले गौरव गोगोई?

आमची मागणी स्पष्ट होती. देशाचे प्रमुख या नात्याने पंतप्रधानांनी संसदेत यावे, बाजू मांडावी आणि अशाप्रसंगी संपूर्ण देश मणिपूरसोबत आहे, असा संदेश पंतप्रधानांनी द्यावा अशी आमची अपेक्षा होती. पण दुर्दैवाने असं झाले नाही. पंतप्रधान आजवर मणिपूरमध्ये का गेले नाही? मणिपूरबाबत बोलण्यासाठी मोदींना ८० दिवस का लागले, ते देखील फक्त ३० सेकंदच का बोलले, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना बडतर्फ का केले नाही? असे तीन प्रश्न काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी सत्ताधाऱ्यांना विचारले.

‘आप करे तो रासलीला, हम करे तो कैरेक्टर ढीला’

सत्ताधारी पक्षाच्यावतीने झारखंडमधील भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी उत्तर दिले. राहुल गांधी आज बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र ते उशिरा उठले असतील असा चिमटा दुबेंनी काँग्रेस पक्षाला काढला. अविश्वास प्रस्ताव मांडणाऱ्या विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत कोणकोणते पक्ष आहेत हे मी तपासले.  ‘इंडिया’ आघाडीतील सर्वात मोठा पक्ष डीएमके आहे. १९७६ मध्ये डीएमकेचं सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन बरखास्त केले होते. १९८० मध्ये जेव्हा इंदिरा गांधींचे सरकार आले त्यावेळी डीएमकेने त्यांना पाठिंबा दिला होता. ‘आप करे तो रासलीला, हम करे तो कैरेक्टर ढीला’ अशा शब्दात दुबेंनी इंडिया आघाडीला फटकारले. मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव यांना तुरुंगात टाकणारा पक्ष काँग्रेसच आहे, मग आमच्यावर आक्षेप का, असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला.

“हो, NCP – नॅचरली करप्ट पार्टी असं म्हटलंय”

आम्ही एनसीपीला नॅचरली करप्ट पार्टी म्हटले आहे. १९८० मध्ये शरद पवारांच्या सरकारला काँग्रेसने बरखास्त केले, पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना का केली, आम्ही नव्हते सांगितले. छगन भुजबळ यांच्यावर काँग्रेसनेच गुन्हा दाखल केला, शरद पवारांवरही काँग्रेसनेच आरोप केले होते. आम्ही हे आरोप केले नव्हते, याकडेही भाजपा खासदाराने लक्ष वेधले.

‘मुलाला सेट करायचं, जावयला भेट द्यायची’

सोनियागांधींचा मला आदर आहे. त्यांना मुलाला सेटल करायचे आहे आणि जावयाला भेट द्यायची आहे, असा टोला निशिकांत दुबेंनी लगावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com