Twitter ची मोठी कारवाई, पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

भारताने यंदा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केली आहे.
Twitter |Pakistan government's Twitter account Withheld in India
Twitter |Pakistan government's Twitter account Withheld in IndiaDainik Gomantak

Pakistan Government's Twitter Account Withheld in India: ट्विटरने मोठी कारवाई करत पाकिस्तान सरकारचे भारतातील खाते ब्लॉक केले आहे.

गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी कारवाई आहे. ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या नोटिसीनुसार, कायदेशीर मागणीवरून पाकिस्तान सरकारचे हे ट्विटर अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे.

Twitter |Pakistan government's Twitter account Withheld in India
Navelim-Cuncolim Road: नावेली-कुंकळ्ळी मार्गाचे रुंदीकरण केले जाणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

ट्विटरनं (Twitter) आपल्या पॉलिसीमध्ये अनेक बदल केले आहेत. ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या नोटिसीनुसार भारताच्या कायदेशीर मागणीवरून पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल भारतात ब्लॉक केले आहे.

जर न्यायालयाचा आदेश किंवा सरकारी मागणी असेल तर त्यावरून अशा प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार ट्विटरला आहे.

पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर गेल्यावर तिथे लिहिले आहे की, भारतातील एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून पाकिस्तान सरकारचे भारतातील ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे, असे दिसले आहे.

दरम्यान, ट्विटरने केलेली ही कारवाई फक्त भारतापूर्ती मर्यादित आहे. पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांमध्ये सक्रिय आहे. या प्रकरणी भारत किंवा पाकिस्तानच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

या प्रकारची कारवाई ही गेल्यावर्षी देखील करण्यात आली होती. जून 2022 मध्ये ट्विटर इंडियाने भारतातील संयुक्त राष्ट्र, तुर्की, इराण आणि इजिप्तमधील पाकिस्तानी दूतावासांची अधिकृत ट्विटर अकाउंट गोठवली होती.

या सोबतच भारतविरोधी खोटी माहिती पसरवणाऱ्या अनेक यूट्यूब चॅनल आणि फेसबुक (Facebook) अकाउंट देखील बंद करण्यात आले होते.

Twitter |Pakistan government's Twitter account Withheld in India
Imran Khan यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, अटकेची टांगती तलवार कायम

दरम्यान, पाकिस्तानचे ट्विटर अकाउंटवर यापूर्वीही भारतात बंद करण्यात आले होते. जुलै2022 मध्ये, पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर भारतात बंदी घातली होती.

परंतु नंतर ती बंदी हटवण्यात आली. पण आता पुन्हा ट्विटरने बॅन आणले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com