'पाकिस्तान भारतासह संपूर्ण जगासाठी डोकेदुखी बनला'

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सातत्याने आतंकवादी कारवाया घडवून आणणे हा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानचा मूळ उद्देशच बनला आहे.
Ram Madhav
Ram MadhavDainik Gomantak
Published on
Updated on

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सातत्याने आतंकवादी कारवाया घडवून आणणे हा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानचा (Pakistan) मूळ उद्देशच बनला आहे. याच पाश्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राम माधव (Ram Madhav) यांनी म्हटले आहे की, दहशतवाद्यांना (Terrorists) आश्रय देणारा पाकिस्तान संपूर्ण जगासाठी डोकेदुखी बनला आहे, कारण जगभरातील आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांशी पाकिस्तानची तार जोडलेली आहे. वॉशिंग्टनमध्ये (Washington) 'जागतिक दहशतवादविरोधी दिना' निमित्त भारतीय वंशाच्या नागरिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना माधव म्हणाले की, जागतीक समुदायाला वैश्विक दहशतवादाला सामोरे जाण्याची गरज आहे.

दरम्यान, भारतीय-अमेरिकन लोकांच्या मेळाव्यात ते म्हणाले, “लक्षात ठेवा, पाकिस्तान हा केवळ भारतासाठी डोकेदुखी नाही तर संपूर्ण जगासाठी डोकेदुखी बनला आहे." राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेले माधव पुढे म्हणाले, “ दहशतवाद्यांची पदचिह्नों पाहा. ते तुम्हाला पाकिस्तानातच सापडतील. दहशतवाद्यांचा प्रायोजक, प्रोत्साहन देणारा, वित्तपुरवठा करणारा, संरक्षण देणारा देश म्हणून पाकिस्तानची ओळख निर्माण झाली आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थानही पाकिस्तान बनला आहे. त्यामुळे आपल्याला त्या देशाशी सामना करावा लागेल."

Ram Madhav
जम्मू-काश्मीरात पुन्हा तणाव, मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत

वॉशिंग्टन डीसीमधील बुद्धिजीवींचा एक गट पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) च्या वाचविण्यामध्ये गुंतला असल्याचा दावा त्यांनी केला. "ते (ISI) दहशतवादी आहेत, परंतु ते अमेरिकेतील काही बुद्धिजीवींना हे पटवून देण्यात यशस्वी झाले आहेत की, ते कठोर परिश्रम घेत आहेत. परंतु हे दहशतवादी गट त्यांच्या नियंत्रणाखाली येत नाहीत,"

दहशतवाद्यांना भारतात पाठवा, नियंत्रणात आणू- माधव

माधव यांनी उपरोधिकपणे सांगितले की, यातील काही दहशतवाद्यांना भारतात पाठवावे, आम्ही त्यांना नियंत्रणात आणू. यावर कार्यक्रमात एकच हशा पिकला. "आपण तिकडे जाऊ या, आम्ही त्यांना संपवू," भारताने काश्मीरसह इतर भागातील दहशतवादी गटांचा आम्ही बरोबर नायनाट केला आहे. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अशा कारवायांची मोठी किंमत चुकवावी लागेल, असेही ते यावेळी म्हणाले.

'द न्यूयॉर्क टाइम्स' आणि 'द वॉशिंग्टन पोस्ट' यांसारख्या काही थिंक टँक आणि सोशल मीडिया संस्था दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगत असल्याचा आरोप माधव यांनी केला. ते म्हणाले की, 'ते दहशतवाद्यांसाठी मानवी हक्क मागतात. अगदी शेवटचा दहशतवादी मारल्याशिवाय जगातील दहशतवादाविरोधातील लढाई यशस्वी होणार नाही.'

Ram Madhav
Jammu Kashmir: माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत

एकही दहशतवादी जिवंत असेपर्यंत मानवता धोक्यात - माधव

ते म्हणाले, "मित्रांनो, दहशतवादाचा पराभव तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा शेवटचा दहशतवादीही संपवला जाईल. व्हायरसप्रमाणे, जोपर्यंत जगातील शेवटचा दहशतवादी जिवंत आहे, तोपर्यंत मानवता धोक्यात राहील. पृथ्वीवरील मानवतेचे हे संकट संपवण्यासाठी सर्वप्रथम एकजुटीने संकल्प करण्याची गरज आहे.

माधव पुढे म्हणाले की, गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाने त्रस्त असलेल्या भारताने त्याचा पराभव केला आहे. “तुम्ही भारतात दहशतवादाचा पराभव केला. तुम्ही म्हणू शकता की, इथे आणि काश्मीरमध्ये दहशतवादी आहेत परंतु आज भारतातील दहशतवाद त्यांच्या नेत्यांना चांगलाच महागात पडला आहे. त्याचे फक्त काही अवशेष उरले आहेत, परंतु ते देखील लवकरच भारतातच नष्ट होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com