Jammu Kashmir: माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत

मुफ्ती (Mehbooba Mufti) मंगळवारी शेर-ए-काश्मीरमधील (Sher-e-Kashmir) त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयाला भेट देणार होते.
Mehbooba Mufti
Mehbooba MuftiDainik Gomantak
Published on
Updated on

जम्मू -काश्मीरच्या (Jammu Kashmir) माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) प्रमुख मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांना प्रशासनाने त्यांच्या श्रीनगर येथील निवासस्थानी पुन्हा नजरकैदेत ठेवले आहे. मुफ्ती मंगळवारी शेर-ए-काश्मीरमधील (Sher-e-Kashmir) त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयाला भेट देणार होते. माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्वत: च्या अटकेबद्दल केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हटले की, हे जम्मू-काश्मीरमधील सामान्य स्थितीचे दावे पूर्णत:हा खोटे आहेत. मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरद्वारे म्हटले की, “भारत सरकार (Government of India) अफगाण लोकांच्या (Afghan people) हक्कांबद्दल चिंता व्यक्त करते, परंतु मुद्दाम काश्मिरींना या अधिकारांपासून वंचित ठेवते. मला आज नजरकैदेत ठेवण्यात आले आहे कारण प्रशासनाच्या मते काश्मीरमधील परिस्थिती सामान्य नाही. हे सामान्य स्थिती सांगण्याचे दावे उघड करतात. ”

Mehbooba Mufti
जम्मू-काश्मीर मध्ये भूकंप,कुठलीही जीवितहानी नाही

याआधी सोमवारी मेहबूबा मुफ्ती यांनी फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी (Syed Ali Shah Geelani) यांच्या कुटुंबाला अंतिम संस्कार करण्यासाठी नाकारल्याबद्दल सरकारवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, हे मानवतेच्या विरोधात असून जम्मू -काश्मीरच्या नागरिकांची कुचंबना करण्यात येत आहे. गिलानी यांचा मृतदेह त्यांच्या घराजवळील मशिदीच्या परिसरातील स्मशानभूमीत दफण करण्यात आला.

दरम्यान, मेहबूबा पक्षाच्या बैठकीनंतर म्हणाल्या, "गिलानी यांच्याशी आमचे मतभेद होते ... लढाई एका जिवंत व्यक्तीशी लढली जाते परंतु जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीसोबत असणारे मतभेद तिथेच संपले पाहिजेत. मृत व्यक्ती सम्मानजनक अंत्यसंस्कारास पात्र असते. माजी मुख्यमंत्री म्हणाले की, गिलानी यांच्या कुटुंबियांनी त्यांचे अंतिम संस्कार करण्यास नकार दिल्याने जम्मू -काश्मीरमधील लोकांना दुःख झाले आहे. "मृत व्यक्तीचे अंतिम संस्कार करण्याचा अधिकार कुटुंबाला आहे. प्रसारमाध्यमांच्या अहवालांद्वारे आपण मृतांविषयी अनादर केल्याबद्दल जे ऐकले ते मानवतेच्या विरोधात आहे. मृत्यूनंतर तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्याचाही आदर करावा लागतो जसे तुम्ही इतर व्यक्तींचा आदर करता.

Mehbooba Mufti
जम्मू-काश्मीर: दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलांचे संयुक्त ऑपरेशन सुरू

त्या पुढे म्हणाल्या की, ईदगाह स्मशानभूमीत दफन करण्याची गिलानी यांची इच्छा मान्य करायला हवी होती. "फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीची शेवटची इच्छा देखील फाशीपूर्वी पूर्ण करण्यात येते."

गिलानी यांचे पार्थिव पाकिस्तानी ध्वजात गुंडाळल्याबद्दल एफआयआरवर टीका

पीडीपी अध्यक्षांनी गिलानी यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांशी झालेल्या कथित गैरवर्तनाचा निषेध केला. त्या म्हणाल्या, "भारताला त्याच्या सभ्यता आणि संस्कृतीसाठी जागतिक पातळीवर ओळखले जाते ... परंतु खोऱ्यात गिलानी यांच्याबाबत जे घडले ते देशाच्या प्रतिमेला अनुसरून नाही." याआधी, मुफ्ती यांनी गिलानी यांच्या मृत्यूनंतर देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल आणि त्यांच्या मृतदेहाला पाकिस्तानी ध्वजात (Pakistani flag) गुंडाळल्याबद्दल एफआयआर नोंदवल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यांनी रविवारी ट्विटच्या माध्यमातून म्हटले होते की, “काश्मीरला ओपन एअर जेलमध्ये बदलण्यात आले आहे आणि मृतांनाही सोडले जात नाही. एका कुटुंबाला दुःख व्यक्त करण्याची आणि स्वतःच्या इच्छेनुसार अंतिम संस्कार करण्याची परवानगी दिली जात नाही. यूएपीए अंतर्गत गिलानी साहेबांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करणे हे दाखवते की, भारत सरकार आतून निर्दयी आहे. हा नवीन भारताचा नवीन काश्मीर आहे."

Mehbooba Mufti
जम्मू-काश्मीर: कॉग्रेस कार्यकर्त्यांनी का जाळला गुलाम नबी आझादांचा पुतळा?

गिलानी यांचा मृतदेह पाकिस्तानी ध्वजात लपेटलेल्या व्हिडिओ क्लिपची दखल घेत बडगाम पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात यूएपीए आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत गुन्हा दाखल केला. दिवंगत फुटीरतावादी नेत्याच्या साथीदारांनी काश्मीर पोलिस गिलानी यांच्या पार्थिवावर पोहोचताच पाकिस्तानी ध्वज काढण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com