Jammu And Kashmir: G20 बैठकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये NIA ची मोठी कारवाई, जैश-ए चा दहशतवादी अटकेत!

Jammu And Kashmir: G20 बैठकीपूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली आहे.
NIA
NIADainik Gomantak

Jammu And Kashmir: G20 बैठकीपूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली आहे. एजन्सीने दहशतवादी कटात सामील असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे.

ज्याचे नाव मोहम्मद उबेद मलिक असल्याचे सांगितले जात आहे. तो कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. एनआयने रविवारी ही माहिती दिली.

मलिक पाकिस्तानस्थित जैशच्या कमांडरच्या संपर्कात होता. मलिक पाकिस्तानस्थित कमांडरला विशेषत: सुरक्षा दलांच्या हालचालींची गुप्त माहिती देत ​​होता, असे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, मलिकच्या ताब्यातून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. एनआयएच्या (NIA) म्हणण्यानुसार, तो काही मोठा दहशतवादी कट राबवण्याचा प्रयत्न करत होता. खरे तर, 2022 मध्ये, एनआयएने खोऱ्यातील दहशतवादी कारस्थानासंदर्भात एफआयआर नोंदवला होता.

NIA
Jammu And Kashmir: श्रीनगरमध्ये हाय अलर्ट! G-20 बैठकीपूर्वी ISI चे K-2 डेस्क सक्रिय; आत्मघातकी हल्ल्याचा धोका

एनआयएच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे आयईडी आणि स्फोटके भारतात सातत्याने पाठवली जात होती, ज्याचा वापर सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी आणि खोऱ्यातील अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यासाठी केला जाणार होता.

सोशल मीडिया (Social Media) अॅप्सवर एकमेकांशी बोलून केवळ मॅन्युअलीच नव्हे तर कोड वर्डमध्येही हा कट रचला जात होता, ज्याचा उद्देश देशातील शांतता भंग करणे, भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे हा होता.

NIA
Jammu Kashmir: राजौरीत भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, IED स्फोटात 2 जवान शहीद, अनेक दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त

G-20 बैठकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे

त्याचवेळी, सोमवारी म्हणजेच 22 मे रोजी श्रीनगरमध्ये G20 बैठक होणार आहे. त्याआधी जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ही बैठक 24 मे पर्यंत चालणार आहे.

एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सीमा सुरक्षा दलाने चिनाब नदीकाठी विशेष बोटींसह गस्त वाढवली आहे.

या बोटी चिनाब नदीकाठच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी खास तयार केल्या आहेत. रात्रंदिवस बोटींची गस्त सुरु आहे. यासोबतच पायी गस्तही केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com