

श्रीनगर: गेल्या वर्षी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटन क्षेत्रात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षभरात दहा लाखांहून अधिक पर्यटकांनी पहलगामला भेट दिली.
परिस्थिती सामान्य झाल्याने पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. जम्मू आणि काश्मीर पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत एकूण नऊ लाख ९३ हजार ५९६ पर्यटकांनी पहलगामला भेट दिली. २२ एप्रिल २०२५ हल्ल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत घट झाली होती.
गेल्या वर्षी २६ जणांचा मृत्यू झालेल्या त्या दुर्दैवी दिवसाची आठवण मनात ठेवत आम्ही येथे आलो आहोत. येथे आता वातावरण पूर्णपणे शांत आणि सामान्य आहे. देशभरातील लोकांनी येथे आवर्जून यावे. जेणेकरून काश्मीर आणि भारत यांच्यातील नाते अधिक बळकट होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
- संदीप सेयाल, पर्यटक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.