Pahalgam Attack: गोळीबार, आरडाओरडा आणि गोंधळ...पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे अंगावर शहारे आणणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

Pahalgam Attack Video: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या दक्षिण काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये बुधवारी घडलेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे.
Pahalgam Attack
Pahalgam AttackDainik Gomantak
Published on
Updated on

पहलगाम: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या दक्षिण काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये घडलेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन ते चार दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु करत अनेक पर्यटकांना थेट लक्ष्य केले. या भयावह हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेचे भीषण दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमधून समोर आले असून, पर्यटकांच्या किंकाळ्यांचा, आरडाओरड्याचा आणि धावपळीचा आवाज यात स्पष्टपणे ऐकू येतो.

काही व्हिडिओंमध्ये पर्यटक नयनरम्य निसर्गाचा आनंद घेत असतानाच अचानक झालेल्या गोळीबारात गोंधळून गेलेले दिसत आहेत. हल्ल्याच्या काही क्षणांनंतरचा एक व्हिडिओ विशेष चर्चेत असून, त्यात दहशतवाद्यांनी 'जा, मोदींना हे सांग' असं म्हणत काही जणांना सोडलं.

Pahalgam Attack
Goa Weather: राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू, वातावरणातील बदलामुळे गोमंतकीय हैराण

या हल्ल्यात कर्नाटकातील शिवमोग्गा येथील मंजुनाथ यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी पल्लवी आणि १८ वर्षीय मुलगा अभिजय हे देखील त्याचवेळी उपस्थित होते. पल्लवीने माध्यमांशी बोलताना तिला आलेला धक्कादायक अनुभव सांगितला.

“आम्ही एकत्र पहलगामला आलो होतो. माझ्या डोळ्यासमोर माझ्या पतीचा मृत्यू झाला. मी स्तब्ध झाले होते. काही सुचत नव्हते, असे पल्लवी म्हणाली.

हल्ल्यादरम्यान पल्लवीने स्वतः दहशतवाद्याला थेट सामोरे जाऊन म्हटले, “तू माझ्या पतीला मारले आहेस, मलाही मार.” त्यावर दहशतवाद्याने उत्तर दिले, “तू मोदींना याबाबत सांगू शकशील, म्हणून तुला सोडतो.” असं त्यानं म्हटलं.

पल्लवी यांनी बचाव पथकाला विनंती केली की, पतीचा मृतदेह लवकर शिवमोगा इथं आणला जावा. त्यांनी म्हटलं की मृतदेह खाली आणण्यात अनेक अडचणी आहेत. हवाई मार्गे मृतदेह घेऊन जाण्याची गरज आहे. मृतदेह लवकर परत आणावा, असं पल्लवी म्हणाल्या.

Pahalgam Attack
Goa: कोकण रेल्वे सुरू झाल्यावर गोव्यात परप्रांतीयांचे लोंढे वाढले, शांत-सुंदर वातावरण बिघडून गेले

पहलगाम येथील या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारने हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काश्मीर खोऱ्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरु केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com