Padma Award 2023: झाकीर हुसेन, मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण

पद्म सन्मानांची घोषणा गृह मंत्रालयातर्फे काल झाली. यात सहा पद्मविभूषण, नऊ पद्मभूषण आणि 91 पद्मश्री अशा 106 पद्म सन्मानार्थींचा समावेश आहे.
Padma Award 2023
Padma Award 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Padma Award 2023: पद्म सन्मानांची घोषणा गृह मंत्रालयातर्फे काल झाली. यात सहा पद्मविभूषण, नऊ पद्मभूषण आणि 91 पद्मश्री अशा 106 पद्म सन्मानार्थींचा समावेश आहे.

यामध्ये सुधा मूर्ती, कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव तसेच ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रपती भवनात मार्च अथवा एप्रिलमध्ये पद्म सन्मान प्रदान केले जातील. यावर्षी ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान कोणालाही जाहीर झालेला नाही.

आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या तबलावादनाने जगभरातील रसिकांची मने जिंकणारे उस्ताद झाकिर हुसेन यांना पद्मविभूषण जाहीर झाला आहे.

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्राण संकटात सापडलेल्यांना वाचविणारे ओआरएस द्रावण तयार करणारे दिलीप महालनबीस, उद्योजक आणि शेअर मार्केटचे बिग बुल म्हणून ओळख असलेल्या दिवंगत राकेश झुनझुनवाला यांचा सरकारने मरणोत्तर गौरव केला आहे. अभिनेत्री रविना टंडन यांचा देखील सन्मान केला आहे.

Padma Award 2023
Padma Award 2023: यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये गोव्याची पाटी कोरी...

राष्ट्रपती पदक

सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस खात्यातील चार अधिकाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पोलिस पदके जाहीर झाली आहेत.

यामध्ये पोलिस महासंचालक जसपाल सिंग (आयपीएस), अधीक्षक विश्राम बोरकर, उपअधीक्षक संतोष देसाई आणि उपअधीक्षक हरिष मडकईकर यांचा समावेश आहे. गोवा पोलिसांना एकाचवेळी चार राष्ट्रपती पदके मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

‘अनसंग हिरों’चा सन्मान

पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करताना लौकिक अर्थाने फारसे प्रकाश झोतात नसलेले परंतु आपापल्या क्षेत्रात निष्ठेने सेवाभावी वृत्तीने काम करणारे दुर्लक्षित नायक (अनसंग हिरो) यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे एकत्रितपणे काम करणाऱ्या अनसंग हिरोंच्या तीन जोड्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

अंदमान निकोबार बेटावरील जारवा आदिवासींचे संरक्षक, पालक बनलेले रतनचंद्र कार, गुजरातच्या सिद्धी आदिवासी समुदायातील सामाजिक कार्यकर्त्या हिराबाई लोबी, भारतीय लष्करातील निवृत्त डॉक्टर आणि 1971 च्या युद्धात शौर्य गाजविलेले मुंशीवरचंद्र डावर (मध्य प्रदेश ), ईशान्य भारतात नागा समुदायासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते आणि रामकुईवांगबे आदींचा समावेश आहे.

Padma Award 2023
Republic Day 2023 Highlights: प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर सैन्यशक्ती अन् संस्कृतींचा अनोखा नजराणा

गोव्‍यातून अनेकांची उत्‍कंठा होती ताणली

गोव्यातून एकाही व्यक्तीला पद्म पुरस्कार मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वी राज्यातील दोन साहित्यिकांची नावे पद्म पुरस्कारासाठी चर्चिली जात होती. त्‍यामुळे अनेकांची उत्‍कंठा ताणली होती. गतवर्षी ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, अर्जुन पुरस्कारप्राप्त ब्रह्मानंद शंखवाळकर यांना पद्मश्री पुरस्‍कार मिळाला होता.

उल्लेखनीय निवड : कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका तोंडावर असताना तेथील ज्येष्ठ राजकीय नेते, माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची पद्मविभूषण सन्मानासाठी झालेली निवडही उल्लेखनीय मानली जात आहे.

उत्तर प्रदेशातील, विशेषतः ओबीसी राजकारणावर आपला ठसा उमटविणारे समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव मुलायमसिंह यादव यांचेही गेल्याच वर्षी निधन झाले होते. त्यांचाही सरकारने सन्मान केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com