Padma Award 2023: यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये गोव्याची पाटी कोरी...

गतवर्षी दोघा गोमंतकीयांना मिळाला होता पद्मश्री पुरस्कार
Padma Award 2023
Padma Award 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Padma Award 2023: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (25 जानेवारी) पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 2023 साठी, राष्ट्रपतींनी 106 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे.

या यादीत 6 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 91 पद्मश्रींचा समावेश आहे. 19 पुरस्कार विजेत्या महिला आहेत. समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला आहे.

Padma Award 2023
BBC डॉक्युमेंटरीवरुन JNU-जामियानंतर पंजाब विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक; जाणून घ्या दिवसभरात काय घडलं

दरम्यान, गोव्यातून एकाही व्यक्तीला पद्म पुरस्कार मिळालेला नाही. मागील काही दिवसांपूर्वी राज्यातील दोन साहित्यिकांची नावे पद्म पुरस्काररासाठी चर्चिली जात होती. मात्र, यंदा गोव्यातून एकाही व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला नाही.

गतवर्षी गोव्यातील दोन व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाला होता. यामध्ये गोव्यातील आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कुंडई येथील दत्त स्वामी पीठाचे आचार्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. तर गोव्याचे माजी फुटबॉलपटू आणि 1983 ते 1986 या काळात भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्व करणाऱ्या अर्जुन पुरस्कार प्राप्त ब्रह्मानंद शंखवाळकर यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

Padma Award 2023
Mahadayi Water Dispute: 'म्हादई'बाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे कर्नाटकला पत्र; स्पष्टीकरण मागवले

यंदाच्या पुरस्कारांमध्ये यांचा समावेश...

बाळकृष्ण दोसी आणि पश्चिम बंगालचे प्रसिध्द डॉ. दिलीप महालानबीस यांनाही पद्मविभूषण (मरणोत्तर) जाहीर झाला. ओआरएसच्या शोधासाठी डॉ. महालनाबीस यांचा गौरव झाला आहे. संगीतकार झाकीर हुसेन, एसएम कृष्णा, श्रीनिवास वर्धन यांनाही पद्मविभूषण जाहीर झाला.

दिमा हासाओ येथील नागा समाजसेवक रामकुईवांगबे न्यूमे, ज्यांनी हेराका धर्माचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले, त्यांना सामाजिक कार्य (संस्कृती) क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.

राकेश झुनझुनवाला यांना पद्मश्री

सुधा मूर्ती, कुमार मंगलम बिर्ला यांचा पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. शेअर मार्केटमधील बिग बुल दिवंगत राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर), RRR चित्रपट संगीतकार एमएम कीरावानी, अभिनेत्री रवीना रवी टंडन यांचा 91 पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.

प्रख्यात नागा संगीतकार आणि नवोदित मोआ सुबोंग यांना कला (लोकसंगीत) क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चिक्कबल्लापूर येथील ज्येष्ठ वादक मुनिवेंकटप्पा यांना कला (लोकसंगीत) क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, छत्तीसगढ़ी नाट्य कलाकार डोमरसिंग कुंवर यांना कला (नृत्य) क्षेत्रातील पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com