OYO To Add 750 Hotels to Platform: हॉटेल बुकिंगची ऑनलाईन सेवा पुरविणारी कंपनी OYO आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आणखी तब्बल 750 हॉटेल्स अॅड करणार आहे. आगामी हिवाळी पर्यटनाचा हंगाम एनकॅश करण्यासाठी ओयो आगामी तीन महिन्यात या नवीन 750 हॉटेल्ससोबत स्वतःला जोडून घेणार आहे.
विशेष म्हणजे, यात कंपनीचे सर्वाधिक लक्ष गोव्यावर असणार आहे. गोव्याकडे पर्यटक नियमित येत असतात. देश-विदेशातील पर्यटकांची पर्यटनासाठी गोव्याला पहिली पसंती असते. शिवाय एक ऑक्टोबरपासून गोव्याच्या यंदाच्या पर्यटन हंगामाला सुरवातही झाली आहे.
दरम्यान, ओयोच्या या नवीन हॉटेल्समधील बहुतेक हॉटेल्स OYO च्या प्रीमियम ब्रँड्स पॅलेट, टाउनहाऊस, टाउनहाऊस ओक आणि कलेक्शन ओ अंतर्गत समाविष्ट केले जातील, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. हॉस्पिटॅलिटी टेक्नॉलॉजी फर्म असलेल्या OYO ने सोमवारी ही माहिती दिली.
OYO ने सांगितले की, सण-उत्सवाचा काळ आणि हिवाळी पर्यटन हंगामाचा फायदा घेण्यासाठी पुढील तीन महिन्यांत 35 हून अधिक बाजारपेठांमध्ये ओयो प्लॅटफॉर्मवर 750 हॉटेल्स जोडली जाणार आहेत.
ही नवीन हॉटेल्स विशेष करून गोवा, जयपूर, मसुरी, ऋषिकेश, कटरा, पुरी, शिमला, नैनिताल, उदयपूर आणि माऊंट अबू या ठिकाणची आहेत. कारण याच बाजारपेठेवर ओयोचे प्रामुख्याने लक्ष आहे.
OYO चे चीफ बिझनेस ऑफिसर अनुज तेजपाल म्हणाले की, या बाजारपेठांमधील आमचा विस्तार प्रवाशांना दर्जेदार निवास देणे, त्यांचा अनुभव संस्मरणीय करणे, या आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे.
नवीन हॉटेल्समुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळणार नाही, तर स्थानिकांना रोजगाराच्या संधीही मिळतील.
हिवाळा हा पर्यटनातील सर्वात महत्वाचा ऋतू आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात हिवाळी पर्यटन हंगाम जोरात असतो. या काळात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढतो. हा काळ पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगासाठी महत्त्वाचा असतो.
अलीकडील सरकारी अहवालानुसार या वर्षी जानेवारी ते जून दरम्यान भारतात आलेल्या परदेशी पर्यटकांची संख्या 2022 मधील याच काळातील आकडेवारीपेक्षा 106 टक्क्यांनी अधिक आहे. कोविडकाळानंतर भारतात परदेशी प्रवाशांची संख्या वाढत असल्याचा आनंद आहे.
दरम्यान, OYO ने प्रवाशांसाठी स्टे नाऊ पे लेटर (SNPL) पर्याय देखील उपलब्ध केला आहे. SNPL मध्ये ग्राहकांना 5,000 रुपयांची क्रेडिट मर्यादा मिळते. ती मुक्कामाच्या 15 दिवसांनंतर सेटल केली जाऊ शकते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.