Taj Mahal
Taj Mahal Dainik Gomantak

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव Taj Mahal मध्ये साजरा होणार नाही, जाणून घ्या काय आहे कारण

Uttar Pradesh News: देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त यावेळी देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे.
Published on

Taj Mahal: देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. यामध्ये देशातील जवळपास सर्व ऐतिहासिक ठिकाणे रात्रीच्या वेळी तिरंग्याच्या प्रकाशाने उजळून निघतात. असे असूनही, आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल अंधारात आहे. असे का होते हे अनेकांना माहीत नसेल, तर चला जाणून घेऊया...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा झाला

वास्तविक, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या आवाहनावरुन सोशल मीडिया प्रोफाइलचा डीपी बदलून 'तिरंगा' प्रतिक म्हणून ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर, हर घर तिरंगा फडकवण्याची तयारीही सुरु आहे. याशिवाय, सरकारी संस्था आणि स्मारके तिरंग्याच्या प्रकाशात उजळून निघत आहेत. आग्रामध्येही (Agra) ऐतिहासिक वास्तू सजवण्यात येत आहेत. मात्र ताजमहालमध्ये (Taj Mahal) असा कोणताही कार्यक्रम होणार नाही.

 Taj Mahal
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्र अव्वल

1997 मध्ये शेवटच्या वेळी ताज पेटला होता

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1997 मध्ये एका शो दरम्यान ताजमहालमध्ये दिवे लावण्यात आले होते. परंतु कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी, ताजमहाल कॉम्प्लेक्समध्ये अनेक कीटक मृत आढळले. यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या रसायन शाखेने तपास केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. यानंतर मात्र, ताजमहालमध्ये दिवे लावण्यास परवानगी देण्यात आली नाही.

 Taj Mahal
दिल्ली HC चा मोठा निर्णय, 'TV अन् Social Media वरील कमेंट अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग'

ताजचे प्रज्वलित चित्र दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आले

तथापि, दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याने मित्र राष्ट्रांसमोर शरणागती पत्करली तेव्हा ताजमहाल उजळून निघाला होता. त्यावेळी ताजमहालात मित्र राष्ट्रांच्या सैन्यासाठी भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ताजमहाल फ्लड लाइट्सने उजळून निघाला होता. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवादरम्यान ताजमहाल प्रकाशमय होणार नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परंतु याचे खरे कारण आहे की, यामुळे तिथे कीटक मरतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com