'अर्थव्यवस्था बुडवणे हेच नोटाबंदीचे एकमेव यश'

राहुल गांधींची पुन्हा केंद्र सरकारवर टीका
Rahul Gandhi
Rahul Gandhi Dainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारची ध्येय - धोरणे अवलंबले जाणारे नव्या धोरणांवर राहूल गांधी नेहमी बोलतच असतात. याच पार्श्वभूमीवर रविवारी पुन्हा नोटाबंदीवरून नरेंद्र मोदींच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, ''2016 च्या निर्णयाचे एकमेव दुर्भाग्यपूर्ण यश म्हणजे भारताची अर्थव्यवस्था बुडणे.'' (only success of the banknote ban is to drown the economy' )

राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वार्षिक अहवालाचा हवाला देत मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट टॅग केला आहे, ज्यामध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 100 टक्के आणि 2,000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर या दोन्ही नोटा जारी करण्यात आल्या आहेत.

Rahul Gandhi
पाकिस्तानमधून बॉम्ब घेऊन येणारं ड्रोन सुरक्षा दलानं पाडलं

लंडनला दौऱ्यावर ही मोदींवर डागले टीकास्त्र

काँग्रेस नेते राहुल गांधी सद्या लंडनला दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात आयडियाज ऑफ इंडिया परिषदेला संबोधित केले होते. यावेळी देशात वाढत असलेला जातियवाद, केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण, रुपया घसरत असताना अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेली ध्येय धोरणे, भारतातील लोकशाहीची स्थिती यावरुन केंद्र सरकारवर हल्ला बोल केला होता.

देशातील वाढता जातीय तणाव याबाबत राहूल गांधी यांना प्रश्न विचारला असता, देशाच्या ध्रुवीकरणासाठी भाजप रॉकेल शिंपडत आहे. तुम्हाला फक्त एक ठिणगी टाकायची आहे, मग देश स्वतःच जळायला लागेल, असे ते यावेळी म्हणाले होते. देशावर आर्थिक संकट घोंगावत असताना सरकार याबाबत गंभीर नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com