उत्तर प्रदेश मध्ये होणार्या पंचायत निवडणूकांपुर्वी (गुरुवारी) संपूर्ण राज्यात मोठा हिंसाचार झालेला मिळाला आहे. हिंसाचाराचे हे स्वरूप एवढे भयानक आहे की, अनेक ठिकाणी बुलेट आणि हातबॉंब सुद्धा डागण्यात आल्याचे समजते आहेत. समाजवादी पक्षाने (एसपी) आरोप केला आहे की, भाजपच्या लोकांनी त्यांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करु दिला नाही, तसेच उमेदवारांचे अर्ज फाडुन टाकले. लखनऊपासून 65 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सीतापूरच्या कसमंडा येथे ब्लॉक प्रमुख उमेदवार मुन्नी देवी अर्ज दाखल करण्यासाठी जात होत्या त्यावेळी तिथे भाजपचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते उभे होते. तेथे पोलिस स्वत: गोळ्या आणि बॉंब आणि पासुन आपला जीव वाचताना दिसले. (Violence erupted in Uttar Pradesh before the elections)
सीतारपुरचे जिल्हाधिकारी विशाल भारद्वाज म्हणाले की, "आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हवेत गोळीबार झाला असुन हिंसाचारात एक व्यक्ती जखमी झाली आहे." त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे असुन पुढील उपचारासाठी त्या व्यक्तीला लखनऊ येथे पाठविण्यात आले आहे.
लखीमपूर खेरी मधील पसगावान येथे एका महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समजते आहे. ही महिला समाजवादी पक्षाच्या उमेदवार असणाऱ्या रितु सिंग यांची समर्थक होती. या महिलेचे कपडे काढण्याचा देखील प्रयत्न झाल्याचे समजते आहे. दुसरीकडे रितु सिंह यांचे वाहन समजुन एसपी एम.एल.सी शशांक यांचे वाहन रोखण्यात आले, परंतु रितू सिंह त्यांना चकमा देऊन फॉर्म दाखल करण्यासाठी पोहोचले असता त्यांचा फॉर्म हिसकाऊन घेण्यात आल्याचा आरोप आहे.
दिवसभर युपीच्या विविध भागातून हिंसाचार घटना सुरू होत्या. इटावामध्ये भाजपच्या उमेदवाराच्या समर्थकांना गोळ्या घालण्यात आल्या. बुलंदशहर येथे मोठ्या हिंसाचारानंतर पोलीसांकडुन लाठीचार्ज करण्यात आला. अयोध्येत सपा आणि भाजप समर्थकांमध्ये दगडफेक सुरू होती. हरदोई येथे दोन ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. आजमगडमध्ये कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे.
गोरखपूरमध्ये सपाचे उमेदवार आणि पोलिस यांच्यात जोरदार संघर्ष सुरू होता, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. नामनिर्देशन केंद्रामध्ये कुलूपबंद झाल्यानंतर त्यांच्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी नव्हती असा आरोप एसपीने केला आहे. दुसरीकडे, यूपीचे ADG प्रशांत कुमार म्हणतात की, हिंसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. या हिंसाचारा नंतर उत्तर प्रदेशमध्ये अजुनही गुंडाराज सुरु असल्याचे बोलले जाते आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.