Odisha Train Accident: ओडिशामध्ये शुक्रवारी संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. बालासोर येथील स्थानकाजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात धडक झाली. या दोन्ही गाड्यांची टक्कर इतकी जोरदार होती की, कोरोमंडल ट्रेन रेल्वे रुळावरुन खाली उतरली.
रेल्वेचे अनेक डब्बे रेल्वे रुळावरुन खाली घसरले. प्रवाशांना काही कळेपर्यंत यशवंतपूरहून हावड्याला जाणारी ट्रेन या डब्यांना धडकली.
यानंतर त्या ट्रेनच्या 3-4 बोगीही रुळावरुन घसरल्या. तीन गाड्यांच्या धडकेनंतर डबे रुळांवर पत्त्यासारखे विखुरले गेले.
दरम्यान, बालासोर रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. याशिवाय 900 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पीएम मोदी ओडिशातील (Odisha) बालासोर येथील अपघातस्थळाला भेट देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करतील. यानंतर पंतप्रधान पीडितांचीही भेट घेणार आहेत.
ओडिशा रेल्वे दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत अपघाताचा आढावा घेण्यात आला. बालासोर रेल्वे अपघात इतका भीषण होता की, काही क्षणातच हाहाकार माजला. डब्यांच्या आत बसलेल्या प्रवाशांना काहीच समजले नाही.
अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी, अनेक प्रवासी रक्तबंबाळ झाले. मात्र त्यानंतर मृतदेहांचे ढीग साचू लागले. लोकांचे प्राण वाचवणे हे सर्वात मोठे आव्हान होते.
घटनास्थळी लगेचच बचावकार्य सुरु झाले. स्थानिक नागरिकांनीही (Citizens) त्यात सक्रिय सहभाग घेतला. ट्रेनच्या डब्यात अडकलेल्या लोकांना गॅस कटरने डब्बा कापून बाहेर काढण्यात आले.
मात्र, हा रेल्वे अपघात कसा झाला, याला जबाबदार कोण, हे तपासानंतरच कळेल. मात्र या बोगींची अवस्था पाहता त्यावेळी किती भीषण अपघात झाला असावा याचा अंदाज लावता जात आहे.
काही सेकंदातच रेल्वेच्या धडकेत अनेकांचा प्रवास अपूर्ण राहिला आणि अनेकांचे सर्वस्व गमावल्याचे स्पष्ट झाले. बालासोरमध्ये घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरु आहे. अडकलेल्यांचा शोध सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.