वीज नाही, पाणी नाही; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितली सत्य परिस्थिती

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये (Ukraine) भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.
Indian Students
Indian StudentsDainik Gomantak
Published on
Updated on

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. (No Electricity No Water Students Stranded In Ukraine Tell True Situation)

दरम्यान, रशियापासून 60 किमी अंतरावर असलेल्या ईशान्य युक्रेनमधील (Ukraine) सुमीमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी वाढत्या हवाई हल्ल्यांदरम्यान देशात परतण्याची मागणी करणारे एसओएस संदेश पाठवत आहेत. सुमी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी असणाऱ्या स्वाथिलने माध्यमाशी बोलताना सांगितले की, ''आम्हाला सायरन आणि एअरस्ट्राईकचे ऐकू येत होते. आम्ही आता आमच्या बंकरमध्ये आहोत. आम्ही सध्या हाय अलर्ट असणाऱ्या भागामध्ये आहोत. तसेच आम्ही रशियाच्या (Russia) अगदी सीमेजवळ आहोत. सुरक्षेच्या समस्येमुळे आम्हाला युक्रेनच्या पश्चिम भागात जाणे अशक्य आहे. रशियन सीमेकडे जाण्यासाठी युक्रेन सरकारकडून कोणतीही सूचना किंवा मंजुरी अद्याप मिळालेली नाही.''

Indian Students
Russia-Ukraine War: युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींची रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी दुसऱ्यांदा चर्चा

तसेच, सुमीमध्ये सुमारे 700 भारतीय विद्यार्थी अडकले असून मायदेशात येण्यासाठी वारंवार मदतीची याचना करत आहेत. त्याच वेळी, वैद्यकीय तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने माध्यमाशी बोलताना सांगितले की, ''आम्ही मागील काही दिवसांपासून या बंकरमध्ये अडकलो आहोत. बाहेर मोठा आवाज ऐकून आम्ही इकडे धावून आलो आहोत. रशियन सीमेवर बसेस आहेत. परंतु तिथे पोहोचायला दीड तासापेक्षा अधिक वेळ लागतो. सततच्या गोळीबारात आम्ही तिथे कसे जाऊ शकतो?''

याशिवाय आणखी एका विद्यार्थ्याने सांगितले की, अद्याप लाईट नाही. पाण्याची टंचाई आहे. बॉम्बस्फोटाचा आवाज आल्यावर आम्ही आमचे पासपोर्ट घेऊन बंकरकडे धावतो. आजूबाजूला घबराटीचं वातावर आहे. माध्यमाशी दिलेल्या व्हिडीओ संदेशात एका विद्यार्थ्याने सांगितले की, "आम्हाला कोणीतरी इथून सुरक्षितरित्या बाहेर काढले का नाही याबद्दल आमच्या मनात शक्यता आहेत. आम्ही खार्किव नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहोत. आता आम्ही पिसोचिनमध्ये अडकलो आहोत. इथे बस किंवा ट्रेनची व्यवस्था नाही. तसेच निर्वासन प्रक्रिया नाही. भारतीय दूतावासाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. शिवाय आमच्याकडे कोणतेही अपडेट नाहीत. आम्ही पूर्णपणे अडकलो आहोत. दूतावासाने काहीही दिले नाही. विद्यार्थ्यी भारत सरकारकडे मदतीची विनंती करत आहेत.''

Indian Students
Russia Ukraine War: जोपर्यंत युक्रेन झुकणार नाही, तोपर्यंत हल्ले सुरूच राहतील

शिवाय, व्हिडिओ दिसणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याने म्हटले की, "आम्ही सकाळपासून आजूबाजूला स्फोटांचे ऐकत आहेत. कृपया आम्हाला मदत करा. आम्ही इथे अडकलो आहोत. आमच्यासोबत अनेक भारतीय महिलाही आहेत. सध्या पिसोचिनमध्ये अडकलेले 300 हून अधिक विद्यार्थी भारतीय दूतावासाकडून मदत किंवा सूचनांच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या 24 तासांत युद्धग्रस्त युक्रेनमधून 15 फ्लाइट्समध्ये 3,000 भारतीयांना बाहेर काढण्यात आल्याचे सरकारने गुरुवारी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com