India vs South Africa Test Series: कसोटी मालिकेपूर्वी मोठा धक्का! पहिल्या टेस्टला मुकणार टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर; कारण काय?

Nitish Kumar Reddy Released India Test Squad: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला.
Nitish Kumar Reddy Released
Nitish Kumar Reddy Dainik Gomantak
Published on
Updated on

Nitish Kumar Reddy Released: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा युवा स्टार अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याला कसोटी संघातून 'रिलीज' करण्यात आले. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, नितीशला 11 नोव्हेंबरपासून राजकोटमध्ये सुरु होत असलेल्या भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' (India 'A' vs South Africa 'A') वनडे मालिकेत खेळता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

पहिला कसोटी सामना खेळणार नाही

दरम्यान, या बातमीनंतर हे स्पष्ट झाले की, नितीश आता कोलकाता येथे 14 नोव्हेंबरपासून सुरु होणारा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही. बीसीसीआयने स्पष्ट केले की, भारत 'अ' आणि दक्षिण आफ्रिका 'अ' यांच्यातील वनडे मालिका संपल्यानंतर नितीश दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पुन्हा टीम इंडियात सामील होईल. नितीशने आज (12 नोव्हेंबर) नेट सेशनमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यासोबत गोलंदाजी केली. त्यानंतर तो थेट राजकोटसाठी रवाना झाला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील कसोटी मालिकेत त्याने 4 षटके गोलंदाजी केली होती, पण त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. मात्र, फलंदाजीमध्ये त्याने 43 धावांचे योगदान दिले होते.

Nitish Kumar Reddy Released
South Africa vs India मालिका ठरणार माजी कर्णधारासाठी अखेरची! 36 वर्षीय दिग्गजाची क्रिकेटमधून निवृत्ती

प्लेइंग-11 बाबत मोठे संकेत

नीतीशला रिलीज केल्यानंतर भारताचे (India) सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांनी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 बाबत मोठे संकेत दिले. डोशेट यांनी खात्री दिली की, उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला ध्रुव जुरेलला रेड्डीच्या जागी स्पेशालिस्ट फलंदाज (Specialist Batsman) म्हणून कसोटी संघात स्थान मिळेल. नियमित यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा देखील इंग्लंड मालिकेदरम्यान झालेल्या पायाच्या दुखापतीतून सावरला असून तो संघात पुनरागमन करत आहे. पहिल्या कसोटीत पंत आणि जुरेल या दोघांनाही प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे टीम इंडियाची फलंदाजी अधिक मजबूत होईल.

Nitish Kumar Reddy Released
India Vs South Africa: टीम इंडिया पुन्हा दक्षिण आफ्रिकेला जाणार, टेस्ट-वनडे आणि टी-20 मालिकेचं शेड्यूल जाहीर

नितीशसाठी महत्त्वाची संधी

दक्षिण आफ्रिका 'अ' संघाने नुकतीच बंगळूरुमध्ये खेळलेली दोन अनौपचारिक कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी ड्रॉ केली. आता हाच संघ राजकोटमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. दुसरा वनडे सामना 16 नोव्हेंबर (रविवार) आणि तिसरा वनडे सामना 19 नोव्हेंबर (बुधवार) रोजी खेळला जाईल. नितीशसाठी हा वनडे मालिकेतील फॉर्म आणि मॅच फिटनेस मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. विशेषत: 30 नोव्हेंबरपासून रांचीमध्ये सुरु होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका (South Africa) वनडे मालिकेसाठी त्याला तयार होण्याची ही संधी आहे.

Nitish Kumar Reddy Released
Australia vs South Africa: ॲनाबेल सदरलँडने रचला इतिहास; महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ठोकले 'द्विशतक'

दोन्ही संघांचे अपडेटेड स्क्वॉड

पहिल्या कसोटीसाठी भारत (अपडेटेड टीम): शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टीरक्षक), यशस्वी जयसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.

एकदिवसीय मालिकेसाठी भारत 'अ' (अपडेटेड टीम): तिलक वर्मा (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, इशान किशन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, निशांत सिंधु, विप्रज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, प्रभसिमरन सिंह (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com