Nitish Kumar: "नितीश कुमारांना पंतप्रधान पदाची ऑफर होती, पण...'', जेडीयूच्या बड्या नेत्याचा दावा

K.C. Tyagi: यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी खास ठरली. भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी यांच्यात घमासान पाहायला मिळाले.
K.C. Tyagi
K.C. TyagiSakal

Nitish Kumar: यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी खास ठरली. भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी यांच्यात घमासान पाहायला मिळाले. भाजपने या निवडणूकीत 400 पार चा नारा दिला होता. मात्र निकालानंतर त्यांना बहुमत मिळाले नाही. भाजपला केवळ 240 जागाच जिंकला आल्या. भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता न आल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या साथीने सत्ता स्थापन करण्याची वेळ आली. यातच आता, नितीश कुमार यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड) प्रमुख नितीश कुमार यांना विरोधी पक्षाने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा दावा पक्षाचे नेते केसी त्यागी यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला आहे. एनडीएला विक्रमी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी इंडिया आघाडी नितीश कुमार यांना पुन्हा सामील करुन घेण्याच्या अटकळांदरम्यान ही टिप्पणी आली आहे.

K.C. Tyagi
Nitish Kumar: बिहारमध्ये राजकीय धुळवड! नितीश यांचे 17 आमदार बेपत्ता, लालूंच्या पक्षाचा दावा

त्यागी यांनी स्पष्ट केले की, ‘’जेडीयूने विरोधकांच्या सर्व ऑफर नाकारल्या आणि पुढील पाच वर्षे एनडीएसोबत काम करण्याची योजना आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देणाऱ्या नितीश कुमारांच्या भाषणाने सर्व अफवांना पूर्णविराम दिला. आम्ही (JDU) एनडीएमध्ये सहभागी झालो तेव्हाच अशा अफवा थांबायला हव्या होत्या.’’

"काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आमच्या नेत्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली त्यामुळे आम्ही दुखावलो. म्हणूनच आम्हाला वेगळा मार्ग धरावा लागला. ज्यांना नितीश कुमार हे इंडिया आघाडीचे संयोजक होण्याच्या लायकीचे नाहीत असे वाटायचे तेच आता त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर देत आहेत. परंतु जेडीयूने आधीच अशा सर्व ऑफर नाकारल्या आहेत. बिहारला विशेष दर्जा देण्याची आमच्या पक्षाची मुख्य मागणी आहे, ज्यामुळे बिहारचा विकास होण्यास मदत होईल,’’ असे त्यागी पुढे म्हणाले.

"राज्याचे विभाजन झाल्यावर सर्व संसाधने, कोळशाच्या खाणी झारखंडकडे गेल्या. बिहारमध्ये केवळ बेरोजगारी, गरिबी आणि स्थलांतरित उरले. बिहारला विशेष दर्जा दिल्याशिवाय त्याचा विकास होऊ शकत नाही," असेही त्यागींनी स्पष्ट केले.

K.C. Tyagi
Nitish Kumar Resign: नितीश कुमार यांनी दिला बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; 'हे' आहे कारण

दुसरीकडे, भाजप स्वबळावर 272 जागा जिंकणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर नितीश कुमार आणि इंडिया आघाडीचे पुनर्मिलन होईल असे म्हटले जात होते. यातच, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी नितीश कुमार यांना फोन केल्याच्या चर्चेने एकच राजकीय खळबळ उडाली होती.

दरम्यान, गुरुवारी नितीश कुमार यांच्या जवळच्या सूत्राने इंडिया आघाडीने दिलेल्या सर्व ऑफरचा दावा फेटाळून लावला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळात जेडीयूला दोन महत्त्वाची पदे मिळणार आहेत. पक्षाने लल्लन सिंह आणि रामनाथ ठाकूर या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या नावाचा प्रस्ताव दिला आहे. लल्लन सिंह हे बिहारमधील मुंगेरमधून लोकसभेवर निवडून आले आहेत, तर रामनाथ ठाकूर हे राज्यसभेचे खासदार आहेत. रामनाथ ठाकूर हे भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com