New BJP President: नितीन नबीन भाजपचे नवे 'सारथी'! अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड

New BJP President Nitin Nabin: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुरु असलेल्या प्रक्रियेला सोमवारी (19 जानेवारी) पूर्णविराम मिळाला.
New BJP President Nitin Nabin
New BJP President Nitin NabinDainik Gomantak
Published on
Updated on

New BJP President: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुरु असलेल्या प्रक्रियेला सोमवारी (19 जानेवारी) पूर्णविराम मिळाला. नितीन नबीन यांची पक्षाच्या सर्वोच्च पदी बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत नितीन नबीन यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणाही नेत्याचा अर्ज न आल्याने पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर भाजपमध्ये 'नितीन नबीन पर्व' सुरु झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पंतप्रधान मोदींचे प्रस्तावक म्हणून समर्थन

या निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः नितीन नबीन यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मांडला. नबीन यांनी आज दुपारी पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाह, राजनाथ सिंह, मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, नबीन यांच्या समर्थनार्थ देशभरातून 37 अर्जांचे संच प्राप्त झाले होते. या सर्व अर्जांची छाननी केल्यानंतर ते वैध ठरले आणि इतर कोणाचाही अर्ज नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना बिनविरोध विजयी घोषित केले.

New BJP President Nitin Nabin
Narendra Modi Resolutions: PM मोदींचा गोवा दौरा आणि त्यांचे 9 संकल्प तडीस नेण्याचे आव्हान

निवडणुकीची पार्श्वभूमी आणि प्रक्रिया

भाजपच्या घटनेनुसार, राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक ही एक लोकशाही प्रक्रिया आहे. या निवडीसाठी 36 पैकी किमान 30 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची निवड होणे आवश्यक होते, जी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच राष्ट्रीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या. 16 जानेवारी रोजी या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती.

नितीन नबीन हे भाजपचे निष्ठावान आणि अनुभवी नेते मानले जातात. पक्षाच्या घटनेनुसार, राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी संबंधित व्यक्ती किमान 15 वर्षे पक्षाची सक्रिय सदस्य असणे आणि किमान चार कार्यकाळ तिने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक असते. नितीन नबीन यांनी या सर्व अटी पूर्ण केल्या असून पाचपेक्षा जास्त राज्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या नावाला सक्रिय पाठिंबा दर्शवला होता.

New BJP President Nitin Nabin
PM Modi Goa Visit: 'श्रीकृष्ण जसे विचार करत होते, तसे PM मोदीही सर्वसमावेशक विचार करतात'; विद्याधीश स्वामींचे गौरवोदगार

निर्वाचक मंडळाची भूमिका

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही राष्ट्रीय परिषद आणि राज्य परिषदांच्या प्रतिनिधींनी बनलेल्या एका विशेष निर्वाचक मंडळाद्वारे केली जाते. या निवडीवर पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी देखरेख ठेवतात. नितीन नबीन यांच्या निवडीमुळे भाजपच्या संघटनात्मक बांधणीत आता तरुण आणि अनुभवी नेतृत्वाचा संगम पाहायला मिळणार आहे. आगामी काळात विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता पक्षाची धुरा अधिकृतपणे नितीन नबीन यांच्याकडे सोपवण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com