NIA Action: दहशतवादी लखबीर सिंग संधूवर NIA ने ठेवले 15 लाखांचे बक्षीस, जाणून घ्या

Terrorist Landa: केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने दहशतवादी लखबीर सिंह संधू उर्फ ​​लांडा याच्यावर 15 लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
NIA
NIADainik Gomantak
Published on
Updated on

Lakhbir Singh Sandhu: केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने दहशतवादी लखबीर सिंग संधू उर्फ ​​लांडा याच्यावर 15 लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. 'लांडा' ​​पंजाबमधील एका दहशतवादी प्रकरणात वॉन्टेड आहे.

एजन्सीच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, "लखबीर सिंग संधू उर्फ ​​'लांडा' याला अटक करण्यात उपयुक्त माहिती देणाऱ्यास 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे." माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लखबीर सिंग पंजाबमधील (Punjab) खलिस्तानसंदर्भात आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करतो. पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील हरिके गावचा रहिवासी असलेला लखबीर सध्या कॅनडातील अल्बर्टा येथील एडमंटनमध्ये लपला आहे.

पंजाबमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये आणि पाकिस्तानमधून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यात त्याचा सहभाग आहे. एनआयएने 20 ऑगस्ट 2022 रोजी लखबीर सिंगविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हे दाखल केले होते.

NIA
NIA Action: कोईम्बतूर अन् मंगळुरु बॉम्बस्फोटांप्रकरणी NIA ची तामिळनाडू, केरळमध्ये छापेमारी

दिल्ली पोलिसांना धमकावण्यात आले

यापूर्वी, दहशतवादी लखबीर सिंगने दिल्ली पोलिसांनाही (Delhi Police) धमकी दिली होती. गेल्या वर्षी त्याने सोशल मीडियावर दिल्ली पोलिसांना धमकी दिली होती. दिल्ली पोलिसांनी पंजाबमध्ये पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, असे त्याने म्हटले होते. एवढेच नाही तर त्याने गँगस्टर हरप्रीत सिंग उर्फ ​​हॅप्पीची हत्या केल्याचा दावाही केला आहे.

NIA
NIA Raid: दहशतवादाबाबत एनआयए पुन्हा सक्रिय, देशातील 14 ठिकाणांवर छापेमारी

सोशल मीडिया पोस्टमध्ये काय लिहिले होते?

लखबीर सिंगने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून दावा केला आहे की, 'गँगस्टर हरप्रीत सिंग उर्फ ​​हॅप्पीची इटलीमध्ये हत्या केली.' हरप्रीत उर्फ ​​हॅप्पी भारतीय एजन्सीला हवा होता. लखबीर सिंगने सोशल मीडियावर लिहिले की, हरप्रीत सिंग हा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि रॉचा इन्फॉर्मर होता, म्हणून मी त्याची हत्या केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com