NIA Raid: दहशतवादाबाबत एनआयए पुन्हा सक्रिय, देशातील 14 ठिकाणांवर छापेमारी

NIA Raid: राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए पुन्हा एकदा दहशतवादाबाबत कारवाई करताना दिसली आहे.
NIA
NIA Dainik Gomantak
Published on
Updated on

NIA Raid: राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए पुन्हा एकदा दहशतवादाबाबत कारवाई करताना दिसली आहे. एजन्सीने देशातील 14 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. पंजाब, जम्मू-काश्मीर आणि दिल्ली या शहरात हे छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएने बब्बर खालसा इंटरनॅशनल, इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन आणि इतर खलिस्तानी दहशतवादी संघटनांच्या विरोधात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

दरम्यान, या छाप्यात एनआयएला (NIA) महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत. ज्यामध्ये देशविरोधी कारवायांशी संबंधित पुरावेही आहेत. त्यांच्या माध्यमातून पंजाबमध्ये दहशत माजवून वातावरण बिघडवण्याचा मोठा कट रचण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यात आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून शस्त्रे, दारुगोळा, स्फोटके, आयईडी इत्यादी दहशतवादी साहित्यांची तस्करी देखील समाविष्ट आहे.

NIA
Chhattisgarh: नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी NIA ने 23 जणांविरुद्ध आरोपपत्र केले दाखल

दहशतवाद्यांना पैसा आणि शस्त्रे पुरवली

एनआयएच्या म्हणण्यानुसार, या दहशतवाद्यांना (Terrorists) शस्त्रे आणि पैशांचा पुरवठा केला जात होता, एवढेच नाही तर देशाच्या अनेक भागात टार्गेट किलिंगसह अनेक ठिकाणी बॉम्बस्फोटांचा कटही रचत होते. एनआयएने 20 ऑगस्ट 2022 रोजी हा गुन्हा नोंदवला होता. सध्या एजन्सी याची चौकशी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com