Prime Minister Dance: दमादम मस्त कलंदर... शिबानी कश्यपच्या गाण्यावर पंतप्रधानांचा भन्नाट डान्स, रंगली अविस्मरणीय मैफल Watch Video

Prime Minister Dance Viral Video: भारतीय संगीताला वेगळं वैशिष्ट्य प्राप्त झालं असून, भाषेची अडचण न मानता अनेक परदेशी चाहत्यांना त्यावर थिरकायला आवडतं.
Shibani Kashyap
Shibani KashyapDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूड गाण्यांची क्रेझ जगभरात पसरलेली असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भारतीय संगीताला वेगळं वैशिष्ट्य प्राप्त झालं असून, भाषेची अडचण न मानता अनेक परदेशी चाहत्यांना त्यावर थिरकायला आवडतं. अशाच एका अप्रतिम प्रसंगाने नुकतेच न्यूझीलंडमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

वर्ल्ड एंड अस – इंडियन फेस्टिवल, न्यूझीलंड चॅप्टर 2025 या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका शिबानी कश्यप हिने सादरीकरण केले. शिबानीच्या आवाजातली ताकद आणि तिच्या गाण्यांचा उत्साही ठेका इतका संसर्गजन्य होता की, प्रेक्षक अक्षरशः नाचायला भाग पडले. वातावरणात जल्लोष पसरला होता.

याच वेळी सर्वात मोठा सरप्राइज पाहायला मिळाला. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लुक्सन हे स्वतः स्टेजवर आले आणि त्यांनी शिबानीच्या गाण्यांवर थिरकायला सुरुवात केली. इतकंच नव्हे, तर शिबानीने त्यांचा हात धरून त्यांना नृत्याचा भाग बनवला. त्या क्षणाने संपूर्ण प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

Shibani Kashyap
Mumbai Goa Highway: पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर दिसली जखमी मगर, मुसळधार पावसाचा वन्यजीवांना धोका

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, सुरुवातीला क्रिस्टोफर लुक्सन शिबानीचे गाणे लक्षपूर्वक ऐकताना दिसतात. हळूहळू ते संगीताच्या तालात रंगतात आणि स्टेजवर नाचू लागतात. पुढे तर विरोधी पक्षनेते देखील या जल्लोषात सामील होतात. एका क्षणात संपूर्ण कार्यक्रमाने सांस्कृतिक एकात्मतेचं अप्रतिम उदाहरण साकारलं.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरत आहे. चाहते यावर कमेंट करत आहेत की, “हेच आहे भारतीय संगीताची खरी ताकद”, तर अनेकांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांच्या साधेपणाचं कौतुक केलं. भारतीय गाणी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून लोकांना एकत्र आणतात याचं हे ताजं उदाहरण ठरलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com