पश्चिम बंगाल सरकारने सोमवारी केंद्राला भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यासंबंधी पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला. या पत्राद्वारे पश्चिम बंगाल सरकार केंद्राला विनंती करणार आहे की, 'प्रशासन जिल्ह्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत असेल तर राज्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकाऱ्यांची संख्या वाढवावी.' राज्याचे उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी (Parth Chatterjee) यांनी दावा केला की, ''पश्चिम बंगालपेक्षा (West Bengal) लहान असलेल्या काही शेजारील राज्यांमध्ये या राज्यापेक्षा जास्त आयएएस (IAS) आणि आयपीएस अधिकारी आहेत.'' (New districts will be formed in West Bengal the state government has asked the Center to increase the number of IAS IPS officers)
चटर्जी म्हणाले की, ''प्रशासन अधिक कार्यक्षमतेने चालवण्यासाठी, राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी पश्चिम बंगाल नागरी सेवा (WBCS) आणि पोलीस सेवे (WBPS) च्या अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. "आमच्याकडे 23 जिल्हे असून जिल्ह्यांची पुनर्रचना केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी यूएसपीसीच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून पश्चिम बंगालसाठी नवीन आयएएस आणि आयपीएस कॅडरचे वाटप वाढवण्यास सांगितले आहे, कारण आमच्याकडे अधिक जिल्हे आहेत.''
चॅटर्जी पुढे म्हणाले की, ''मंत्रिमंडळाने आरोग्य विभागातील एकूण 11,551 रिक्त पदे प्रामुख्याने शहरी आणि ग्रामीण भागात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कंत्राटी कामगारांसह भरण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न आणि पुरवठा विभागात डेटा एंट्री ऑपरेटरच्या 342 रिक्त पदांवरही भरती होणार आहे.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.