Digital India: डिजिटल इंडियाच्या नव्या पर्वासाठी भारत सज्ज! PM मोदींनी 'जीएफएफ'मध्ये मांडली चतु:सूत्री; फिनटेक उद्योगाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

PM Modi Digital India New Chapter: ‘डिजिटल इंडिया’ची यशस्वी कथा आता नव्या अध्यायासाठी तयार आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातील नव्या संधी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी उद्योगधुरिणांसमोर चतु:सूत्रीची मांडणी केली.
PM Modi Digital India New Chapter
Digital IndiaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मुंबई: ‘डिजिटल इंडिया’ची यशस्वी कथा आता नव्या अध्यायासाठी तयार आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातील नव्या संधी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी उद्योगधुरिणांसमोर चतु:सूत्रीची मांडणी केली.

सायबर सिक्युरिटी क्षेत्रात भारताला सर्वोच्च बनवावे, ‘फिनटेक’ इंडस्ट्रीने स्वत:ची नैतिक डेटानिर्मिती मानके तयार करावीत, सक्षम अशी ‘फिनटेक’ नियामक नवकल्पना परियंत्रणा तयार करावी आणि प्रत्येक ‘फिनटेक’ कंपनीच्या पारदर्शक मानांकनासाठी ‘फिनटेक’ ग्राहक संरक्षण निर्देशांक तयार करावा, असे चार मुद्दे मोदी यांनी मांडले.

PM Modi Digital India New Chapter
Goa Panchayat: सरपंचांच्या एकहाती 'सील' कारवाईला लगाम! पंचायतींसाठी सरकारची नवी कार्यपद्धती; आता ठरावाशिवाय करता येणार नाही कारवाई

मोदींची चतु:सूत्री

१. सायबर सुरक्षेत भारत सर्वोच्चस्थानी हवा

२. ‘फिनटेक’ इंडस्ट्रीकडे स्वत:ची नैतिक डेटानिर्मिती मानके असावीत

३. ‘फिनटेक’ नियामक नवकल्पना परियंत्रणा तयार करावी

४. ‘फिनटेक’ ग्राहक संरक्षण निर्देशांक तयार करावा

मोदींच्या कार्यक्रमापूर्वी घुसखोरीचा प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथे मंगळवारी झालेल्या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवत तिघांनी घुसखोरी केल्याचा प्रकार सोमवारी घडला. त्यातील एका २४ वर्षीय संशयिताने पीएमओ अधिकारी, तर दोघांनी अंगरक्षक म्हणून प्रवेश मिळवला; मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांचा माग काढून त्यातील दोघांना अटक करण्यात आली.

PM Modi Digital India New Chapter
Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

त्यातील एकाकडून रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे जप्त करण्यात आली. बीकेसी येथील जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये पंतप्रधान कार्यालयाचे ओळखपत्र दाखवून मंगळवारी (ता. ८) तिघांनी रिव्हॉल्व्हरसह प्रवेश केला. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी खासगी सुरक्षारक्षकांकडे चौकशी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Specialty Drugs Exempt From New US Tariff
Modi Cabinet Reshuffle 2026
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
Gen Z Voters India Elections
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com