Solo Tracking Ban: भारताशेजारील 'या' देशांमध्ये सोलो ट्रेकिंगवर बॅन; वाचा सविस्तर

सोलो ट्रेकिंग बंद का करण्यात आले आहे.
solo Trip
solo TripDainik Gomantak

Solo Tracking Ban:  माउंट एव्हरेस्टवर सोलो ट्रेकिंगवर बॅन आणल्यानंतर आता भारताशेजारील सुंदर देश अशी ओळख असलेल्या नेपाळ सरकारने देशभरात सोलो ट्रेकिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

नेपाळमधील अनेक शिखरे सर करण्यासाठी भारतासह जगभरातील पर्यटक गर्दी करत असतात. सोलो ट्रेकिंग करताना अनेकदा पर्यटकांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना शोधणे कठीण जात असल्यामुळे नेपाळ टुरिस्ट बोर्डाने सोलो ट्रेकिंग करण्यावर बंदी घालत एप्रिल महिन्यापासून नवे नियम लागू केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता नेपाळ सरकारच्या या निर्णयामुळे याचा परिणाम अनेक पर्यटकांवर होणार आहे.

माउंट एव्हरेस्टसह जगातील आठ उंच पर्वतं हे केवळ नेपाळमध्ये आहेत. या शिखरांना सर करण्यासाठी अनेक पर्यटक सोलो ट्रेकिंगसाठी येतात. एकट्याने प्रवास करणाऱ्या पर्यटकांचा शिखरावरून पडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या होत्या.

त्यानंतर मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना (Tourist) शोधणं कठीण जात असल्याचे नेटीबीने म्हटले आहे. त्यामुळे आता पर्यटकांना नेपाळमधील शिखरे सर करायची असतील तर त्यांना एकटे जाता येणार नाही. बेपत्ता झालेल्या पर्यटकांना शोधण्यासाठी आतापर्यंत नेपाळ सरकारने मोठ्या प्रमाणात पैसा (Money) खर्च केला होता.

solo Trip
मोठी बातमी! 'या' राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांना मिळणार 5 लाखांपर्यंत पगार, पण...

सोलो ट्रेकिंग करणारे पर्यटक एकटे असतील तर शिखरावर त्यांना मदत करणारे कुणीही नसते. त्यामुळे सोलो ट्रेकिंग करणारे पर्यटक जेव्हा बेपत्ता होतात, तर त्यांना शोधणे शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं नेपाळ टुरिझम बोर्डाचे प्रभारी मणिआर लामिछाने यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी TIMS कार्ड अनिवार्य करण्यात येणार असल्याचंही लामिछाने यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com