Nepal Floods: नेपाळच्या महापुरातून 21 भारतीयांची सुखरुप सुटका, परराष्ट्र मंत्रालयाकडून यादी जाहीर; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Nepal Floods 21 Tamil Nadu Pilgrims Rescued: नेपाळ-तिबेट सीमाभागात आलेल्या विनाशकारी महापुरात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकारकडून व्यापक स्तरावर मोहीम राबवली जात आहे.
21 Indian pilgrims rescued from Nepal floods by rescue teams
Nepal Floods 21 Tamil Nadu Pilgrims rescued by rescue teamDainik Gomantak
Published on
Updated on

Nepal Floods 21 Tamil Nadu Pilgrims Rescued: नेपाळ-तिबेट सीमाभागात आलेल्या विनाशकारी महापुरात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकारकडून व्यापक स्तरावर मोहीम राबवली जात आहे. कैलाश मानसरोवर यात्रेदरम्यान नेपाळमधील भीषण पुरामुळे अडकून पडलेल्या तामिळनाडूतील 21 भाविकांना सुखरुप बाहेर काढण्यात भारतीय यंत्रणांना यश आले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मदतकार्याची माहिती देताना सांगितले की, चीनच्या हद्दीतील बाधित भागात अडकलेल्या सुमारे 200 भारतीय नागरिकांनी सुरक्षित बाहेर पडण्यासाठी भारत (India) सरकारकडे तातडीची मदत मागितली आहे.

21 Indian pilgrims rescued from Nepal floods by rescue teams
Nepal Floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 288 भारतीय बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; मदतीसाठी कंट्रोल रुम-हेल्पलाइन सुरु

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात उद्भवलेल्या या अभूतपूर्व आपत्तीत संपर्क तुटलेल्या नागरिकांचा शोध घेणे हे भारतीय दूतावासापुढील सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुमारे 288 भारतीयांशी संपर्क होऊ शकलेला नाही. यामध्ये त्रिशूली-1 जलविद्युत प्रकल्पात कार्यरत असलेले 73 भारतीय कामगार, सम्राट आणि फ्लाय एव्हरेस्ट ट्रॅव्हल्सद्वारे गेलेले तामिळनाडूतील पर्यटकांचे दोन गट, पश्चिम बंगालमधील 32 जणांचा संघ आणि केरळमधील 33 नागरिकांचा समावेश आहे.

21 Indian pilgrims rescued from Nepal floods by rescue teams
Nepal Flood: नेपाळच्या विनाशकारी महापुरामुळे भारतीयांवर मोठं संकट! 100 हून अधिक नागरिक बेपत्ता, MEA कडून हेल्पलाइन जारी

वीज आणि दूरसंचार यंत्रणा पूर्णपणे बंद पडल्यामुळे रसुवा आणि तिमुरे या दुर्गम भागांत अडकलेल्या लोकांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. तिबेटच्या बाजूने प्रवास करणारे भाविक देखील सध्या सुरक्षित स्थळांकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या 95 भारतीय नागरिक गारचन येथून नेपाळ सीमेवरील बिल्साच्या दिशेने येत असून, इतर भाविक जीलोंग, झुतुलपो आणि सागा परिसरात अडकले आहेत.

21 Indian pilgrims rescued from Nepal floods by rescue teams
Nepal Gen Z Protest: नेपाळ देशात आता लष्कराची हुकूमत; फ्रान्समध्येही सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष, पोलिस बळाचा वापर

परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन काठमांडूतील भारतीय दूतावास स्थानिक अधिकारी आणि पर्यटन संस्थांशी सतत संपर्क ठेवून आहे. या संकटसमयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधून दुर्घटनेबद्दल आपल्या संवेदना व्यक्त केल्या. भारत नेपाळच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय, शक्य ती सर्व मदत पुरवण्यास तयार असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

21 Indian pilgrims rescued from Nepal floods by rescue teams
Nepal President Resigned: पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यानंतर राम चंद्र पौडेल यांनी दिला राष्ट्रपती पदाचा राजीनामा; नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप!

महापुरातून वाचलेल्यांची यादी

1. शिवरंजनी मुथुनाथन
2. कर्पगम राजमोहन
3. मारन गोविंदासामी
4. शांति मारन
5. मुथुकुमारेसन रामलिंगम
6. नवू कबीरदास
7. विजयभुवनेश्वरी विश्वनाथन
8. मैथिली मुथुकुमारेसन
9. त्यागराजन रथिनम
10. किरुबागरी बालासुब्रमण्यम
11. वल्लीनायकी शिवकुमार
12. साथिया जयारमन
13. थिरुमावलवन गोविंदरासु
14. कनागासाबाई नतेसापिल्लई
15. राधाई कनागासाबाई
16. रथिनाकुमार कुंचिथपथम
17. पुंगुझाली पोन्नम्बलम
18. पजानियाप्पन मैकापेरुमल
19. कलाईमथी पझानियाप्पन
20. रघुनाथन मुनिराज
21. कनागासाबाई नतेसा पिल्लई

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com