Navratri 2022: TMC MP महुआ मोईत्रा यांचा जबरदस्त डान्स तुम्ही पाहिलायं का? VIDEO

Mahua Moitra Dance: खासदार मोइत्रा यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात दुर्गापूजेदरम्यान महापंचमी साजरी करतानाचा व्हिडिओ शेअर केला.
Mahua Moitra
Mahua Moitra Dainik Gomantak
Published on
Updated on

Mahua Moitra Dance Video: नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा सध्या दुर्गापूजेत सक्रियपणे सहभागी होत आहे. याच क्रमाने खासदार मोइत्रा यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात दुर्गापूजेदरम्यान महापंचमी साजरी करतानाचा व्हिडिओ शेअर केला. या सोहळ्यात त्या इतर महिलांसोबत डान्स करताना दिसत आहे. लोक त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर आणि लाईक करत आहेत.

महुआ मोइत्रांनी डान्स व्हिडिओ शेअर केला

हा डान्स व्हिडिओ स्वतः मोइत्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. व्हिडीओ ट्विट करत त्यांनी लिहिले की, 'नादियातील महापंचमी सेलिब्रेशनचे सुंदर क्षण.' व्हिडिओमध्ये, मोईत्रा महापंचमीच्या मिरवणुकीत रस्त्यावर इतर अनेक महिलांसोबत 'सोहाग चांद बोडोनी धोनी नाचो तो देखी' या बंगाली लोकगीतावर नाचताना दिसत आहे.

Mahua Moitra
काँग्रेस पक्ष एकटा भाजपला पराभूत करूच शकत नाही: महुआ मोईत्रा

मोइत्रांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे

महुआ मोईत्रा (Mahua Moitra) ज्या लोकगीतावर नाचत आहेत, त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? या गाण्याचा मराठी अर्थ असा आहे की, 'हे सुंदरी, चंद्रासारखा चेहरा असलेली...' या सोहळ्यात मोईत्रा यांनी नृत्य केले. मोइत्रांचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे.

Mahua Moitra
आम्ही नक्कीच भाजपावर विजय मिळवू : महुआ मोईत्रा

स्कंदमातेची पूजा

नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी साजऱ्या झालेल्या महापंचमीला भक्तांनी दुर्गेच्या पाचव्या अवताराची पूजा केली. शुक्रवारी महापंचमी साजरी केली जात आहे. ती पूज्य देवी स्कंदमातेला समर्पित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com