Navjot Singh Sidhu
Navjot Singh SidhuDainik Gomantak

मुक्काम पोस्ट जेल, नवज्योत सिंग सिद्धू करणार 'क्लार्क' चे काम

पंजाबच्या पटियाला सेंट्रल जेलमध्ये बंद असलेले पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) हे लिपिक म्हणून काम करणार आहेत.
Published on

पंजाबच्या पटियाला सेंट्रल जेलमध्ये बंद असलेले पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू हे लिपिक म्हणून काम करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कैदी क्रमांक 241383 नवज्योत सिंग सिद्धू यांना बॅरेक क्रमांक 7 मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना लिपिकाची नोकरी देण्यात आली आहे. (Navjot Singh Sidhu convicted in 1988 road rage case, will work as clerk at Patiala Central jail)

मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव सिद्धू आपल्या सेलमधूनच काम करणार आहेत. फाइल्स त्यांच्या बॅरेकमध्ये पाठवल्या जातील. पहिले तीन महिने त्यांना पगाराशिवाय प्रशिक्षण दिले जाईल आणि नंतर त्यांना प्रतिदिन 30-90 रुपये दिले जातील. हे पैसे थेट त्यांच्या खात्यात पाठवले जातील. कारागृहातील कैदी दिवसाचे आठ तास काम करु शकतात.

Navjot Singh Sidhu
"वैचारिक मतभेद, पण...": तजिंदर बग्गासाठी नवज्योत सिंग सिद्धू उतरले मैदानात

दुसरीकडे, तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, 58 वर्षीय सिद्धू यांना न्यायालयीन निर्णय कशापध्दतीने संक्षिप्त करायचे आणि तुरुंगातील नोंदी कशा संकलित करायच्या हे शिकवले जाईल.

तसेच, 'रोड रेज' प्रकरणात सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना पटियाला (Patiala) सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. पहिल्या दिवशी त्यांनी तुरुंगात जेवण केले नाही. त्याचवेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सिद्धू यांना वैद्यकीय तपासणीसाठी पटियाला येथील राजिंद्र रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले.

Navjot Singh Sidhu
'मुद्यांवर तडजोड नाही न्याय आणि सत्यासाठी लढतच राहील': नवज्योत सिंग सिद्धू

याशिवाय, सिद्धू यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, ते गहू, साखर आणि मैद्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ घेऊ शकत नाही. ते जामुन, पपई, पेरु, डबल टोन्ड दूध हे खाद्यपदार्थ घेऊ शकतात. ज्यामध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्स नसतात. अशा परिस्थितीत ते जेलचे अन्न खाऊ शकत नाहीत. त्याचवेळी डॉक्टरांच्या (Doctor) एका पॅनेलने सुचविलेल्या सातवेळच्या आहाराचा तक्ता न्यायालयाने मंजूर केला आहे. हे अन्न आता त्यांना तुरुंगात दिले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com